Color Picture Of The Universe: 'ब्रह्मांड असं दिसतं' नासाकडून पहिला रंगीत फोटो ट्वीट; बायडन म्हणाले, हाच तो ऐतिहासिक क्षण
"जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप" (James Webb Space Telescope) अंतराळ दुर्बिणीने काढलेल्या ब्रह्मांडाचा पहिला पूर्ण रंगीत फोटो नासानं जाहीर केला.
Color Picture Of The Universe : नासानं (Nasa) सोमवारी (11 जुलै) जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली असलेल्या "जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप" (James Webb Space Telescope) या अंतराळ दुर्बिणीने काढलेल्या ब्रह्मांडाचा पहिला पूर्ण रंगीत फोटो जाहीर केला. हा फोटो ब्रह्मांडाचा सर्वात हाय रिजॉल्यूशन (Highest Resolution) असणारा फोटो आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) यांनी हा फोटो शेअर केला आहे.
जो बायडन यांनी शेअर केला फोटो
जो बायडन यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, वेब स्पेस टेलिस्कोपमधील हा पहिला फोटो विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील एक ऐतिहासिक क्षण दर्शवतो. हा खगोलशास्त्र, अवकाश संशोधनासाठी ऐतिहासिक क्षण आहे. तसेच हे अमेरिकेसाठी आणि संपूर्ण मानवतेसाठी आहे. '
जो बायडन यांचे ट्वीट:
The first image from the Webb Space Telescope represents a historic moment for science and technology. For astronomy and space exploration.
— President Biden (@POTUS) July 11, 2022
And for America and all humanity. pic.twitter.com/cI2UUQcQXj
नासाच्या ट्विटर अकाऊंटवरुन देखील हा फोटो शेअर करण्यात आला आहे. नासाच्या वेबसाइटवर देखील हे फोटो लोक पाहू शकणार आहेत. व्हाईट हाऊसच्या इव्हेंटमध्ये रिलीज केलेला हा "डीप फील्ड" फोटो हा ताऱ्यांनी भरलेली आहे. कमला हॅरिसनं कार्यक्रमाच्या दरम्यान म्हणाल्या, 'हा क्षण आपल्यासर्वांसाठी खास आहे. आजचा दिवस विश्वासाठी एक रोमांचक आणि नवा अध्याय सुरु करणारा आहे.',नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी गेल्या महिन्यात एका मुलाखतीमध्ये सांगितले की, "आम्ही मानवतेला विश्वाबद्दल एक नवीन दृष्टीकोन देणार आहोत आणि हे असे दृश्य आहे जे आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नव्हते."
👀 Sneak a peek at the deepest & sharpest infrared image of the early universe ever taken — all in a day’s work for the Webb telescope. (Literally, capturing it took less than a day!) This is Webb’s first image released as we begin to #UnfoldTheUniverse: https://t.co/tlougFWg8B pic.twitter.com/Y7ebmQwT7j
— NASA Webb Telescope (@NASAWebb) July 11, 2022
नासाने शुक्रवारी जेम्स वेबची पहिली पाच वैश्विक उद्दिष्टे उघड केली. यामध्ये कॅरिना नेबुला, WASP-96b, सदर्न रिंग नेबुला, स्टीफन्स क्विंटेट आणि SMACS 0723 यांचा समावेश होता.
हेही वाचा: