एक्स्प्लोर

World Literacy Day 2023 : जगभरात आज साजरा केला जातोय जागतिक साक्षरता दिवस; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

World Literacy Day 2023 : एक साक्षर आणि सक्षम समाज घडविण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

World Literacy Day 2023 : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (World Literacy Day 2023) दरवर्षी 8 सप्टेंबरला संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरुवात 1966 सालापासून झाली. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि जगभरातील लोकांचे शिक्षणाकडे लक्ष वेधणे असा आहे. एक साक्षर आणि सक्षम समाज घडविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. जागतिक साक्षरता दिवसानिमित्ताने जगभर शिक्षणाविषयी जनजागृती केली जाते. 

साक्षरता म्हणजे काय? (What is World Literacy Day 2023) :

साक्षरता हा शब्द साक्षर या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ वाचन आणि लिहिण्यास सक्षम असणे असा होतो. जगातील सर्व देश त्यांच्या प्रत्येक वर्गातील नागरिकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने साक्षरता दिवस साजरा करतात. भारतात सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती किमान एका भाषेत लिहू-वाचू-बोलू शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजतात. थोडक्यात साक्षरतेसाठी देशात अक्षर ओळख असण्याला महत्त्व आहे. पण साक्षरता म्हणजे एवढेच नाही तर साक्षरता म्हणजे आपल्या हक्कांविषयी आणि कर्तव्यांविषयी जाणीव असणे. 

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा इतिहास? (World Literacy Day History 2023) :

दरवर्षी 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो, ज्याचा उद्देश प्रत्येक व्यक्ती, समुदाय आणि समाजापर्यंत शिक्षणाचे महत्त्व पोहोचवणे हा आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने 26 ऑक्टोबर 1966 रोजी UNESCO जनरल कॉन्फरन्सच्या 14 व्या सत्रात या दिवसाची घोषणा केली. 1967 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. युनेस्कोच्या मते, जगभरात 771 दशलक्ष निरक्षर लोक आहेत, ज्यांच्यासाठी शिक्षण हे एक मोठे आव्हान आहे. जगातील 771 दशलक्ष लोकांपैकी बहुतेक महिला आहेत. 

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे महत्त्व 

शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव लोकांना व्हावी आणि शिक्षणाबद्दल जागरुकता वाढावी, हा साक्षरता दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. शिक्षण घेतले तर कोणताही माणूस जीवनात यश मिळवू शकतो. कोणत्याही देशातील साक्षरतेचे प्रमाण किंवा साक्षरतेचा दर वाढला तर त्या देशाचाही झपाट्याने विकास होतो. 

काय आहे साक्षरता दिवसाची संकल्पना? (World Literacy Day Theme 2023) :

साक्षरता दिवसाचा उद्देश नागरिकांना साक्षर होण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. दरवर्षी साक्षरता दिवसानिमित्त थीम असते. त्याुसार यावर्षीची थीम 'बदलत्या जगात साक्षरतेला प्रोत्साहन : शाश्वत आणि शांततापूर्ण समाजाचा पाया तयार करणे' अशी आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Important Days in September 2023 : 'गणेश चतुर्थी', 'गोपाळकाला', 'पोळा'सह विविध सणांची मांदियाळी, सप्टेंबर महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
Embed widget