World Health Day 2021: आज साजरा केला जातोय जागतिक आरोग्य दिवस, जाणून घ्या काय आहे त्याचा उद्देश
World Health Day 2021: आज जगभरात 71 वा जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातोय. याची सुरुवात 1950 साली जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली होती.
नवी दिल्ली : दरवर्षी 7 एप्रिलला जगभरात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातोय. याची सुरुवात 1950 साली जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली होती. सन 1948 साली 7 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जावा असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर 1950 पासून हा दिवस साजरा केला जातोय. आज जगभरात 71 वा जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात येतोय.
आजच्या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जगभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. सुरुवातीला काही मोजक्या देशांत हा दिवस साजरा केला जायचा. आता जगभरातील बहुतांश देशात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातोय. हा दिवस साजरा करताना दरवर्षी एक खास थीमचे आयोजन करण्यात येतंय. या वर्षी जागतिक आरोग्य दिवस साजरा करताना 'एक निष्पक्ष, स्वस्थ जगाची निर्मिती' ही थीम आहे.
जगावर आज कोरोनाचे संकट आले आहे. अनेक देशात कोरोनामुळे मृत्यू वाढत आहेत. काही मागास देशांत अजूनही कोरोनाचे लसीकरण सुरू झाले नाही. कोरोनाच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीकरणात भेदभाव होऊ नये म्हणून मोठं काम केलंय.
कोरोना व्यतिरिक्त आजही जगभरातील लाखो लोक अनेक जीवघेण्या आजारांशी झुंजत आहेत. यामध्ये मलेरिया, हैजा, टीबी, पोलिओ, कुष्ठरोग, कॅन्सर आणि एचआयव्ही एड्स यांचा समावेश होतोय. जगभरातील लोकांना सामाजिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ बनवणे आणि जागरुकता निर्माण करणे हा जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
जागतिक आरोग्य दिवस साजरा करताना जगभरातील लोकांनी आपल्या आरोग्याची देखभाल करणे तसेच आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे यासाठी प्रयत्न केले जातात. जागतिक आरोग्य संघटनेच्या सोबतच इतर संघटनाही या क्षेत्रात काम करतात, जागतिक आरोग्य संघटनेच्या कामात मदत करतात.
महत्वाच्या बातम्या :
- Justice NV Ramana Next CJI: न्यायमूर्ती एनव्ही रमणा देशाचे पुढील सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली मंजुरी
- मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख आणि राज्य सरकारच्या सुप्रीम कोर्टात दोन स्वतंत्र याचिका
- दिल्लीत लॉकडाऊन होईल का? नाईट कर्फ्यूच्या घोषणेदरम्यान केजरीवाल सरकारनं काय सांगितलं