एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Women's Equality Day 2023 : जगभरात आज साजरा केला जातोय 'महिला समानता दिन'; वाचा या दिनाचा इतिहास

Women's Equality Day 2023 : अमेरिकेत महिलांच्या हक्कांसाठी लढा 1853 मध्ये सुरू झाला. ज्यात पहिल्या विवाहित महिलांनी मालमत्तेवर अधिकारांची मागणी करण्यास सुरुवात केली.

Women's Equality Day 2023 : आज महिला समानता दिवस म्हणजेच (Women Equality Day). जरी कायद्याच्या दृष्टीने महिला आणि पुरुषांना समान अधिकार आहेत. पण समाजात अजूनही लोकांची स्त्रियांबाबत दुटप्पी मानसिकता आहे. आजही त्यांना पुरुषांइतके अधिकार मिळाले नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे का की कोणत्या देशात महिलांच्या समानतेच्या अधिकाराची पहिली गोष्ट होती. खरं तर, अमेरिकेच्या महिलांनी याबद्दल प्रथम बोलले. अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकारही नव्हता. 50 वर्षे लढल्यानंतर अमेरिकेतील महिलांना 26 ऑगस्ट 1920 रोजी मतदानाचा अधिकार मिळाला. हा दिवस लक्षात ठेवून महिला समानता दिन साजरा केला जाऊ लागला.

अमेरिकेत हा दिवस महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो. स्त्री -पुरुष समानतेचा प्रश्न हा केवळ अमेरिकेचा प्रश्न नाही. अनेक देश या विषमतेशी झगडत आहेत. जिथे या संदर्भात लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. अमेरिकेबरोबरच महिलांच्या समानतेचा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय झाला आहे. हा दिवस भारतातही साजरा केला जातो. आता महिला समानता दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जात आहे.
 
अमेरिकेत महिलांच्या हक्कांसाठी लढा 1853 मध्ये सुरू झाला. ज्यात पहिल्या विवाहित महिलांनी मालमत्तेवर अधिकारांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अमेरिकेत महिलांची स्थिती आजच्यासारखी नव्हती. 1920 मध्ये महिलांनी मतदानाच्या अधिकाराच्या लढ्यात विजय मिळवला. त्याचबरोबर भारतातही ब्रिटिश राजवटीत महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. अमेरिकेत 26 ऑगस्ट हा महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही साजरे होऊ लागले.

पहिल्या महायुद्धाच्या काळात महिला चळवळीला गती

महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी सुरु केलेल्या चळवळीला पहिल्या महायुद्धाच्या काळात गती मिळाली. लोकशाहीच्या संरक्षणासाठी अमेरिकेने या युद्धात भाग घेतल्याचं अमेरिकन सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यावर आंदोलन करणाऱ्या महिला संघटनांनी टीका केली. जगभरातल्या लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढा देणारे अमेरिकन सरकार त्यांच्याच देशातील अर्ध्या लोकसंख्येला मूलभूत अधिकार नाकारत असून सरकारची ही भूमिका दुटप्पी असल्याची टीका करण्यात आली.

महिला चळवळीचा विजय

अमेरिकेतल्या महिलांना मतदानाचा अधिकार द्यायचा असेल तर दोन तृतियांश राज्यांच्या मान्यतेची गरज होती. म्हणजे 50 पैकी 36 राज्यांनी महिलांच्या अधिकारांना मान्यता दिल्यास ही घटनादुरुस्ती होणार होती. त्यावर अमेरिकेतल्या महिलांनी त्यांच्या चळवळीची तीव्रता वाढवली आणि सरकारवर मोठा दबाव निर्माण केला. त्याचा परिणाम म्हणजे 26 ऑगस्ट 1920 साली अमेरिकेतल्या महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. याच घटनेच्या स्मरणार्थ 26 ऑगस्ट हा महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget