![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Trending : मला कोरोना झालाय, रजा हवी, गंडवणाऱ्या महिलेला बॉसकडून मोठी शिक्षा
अमेरिकेतील (America) एका महिलेनं खोटं कारण सांगून सुट्टी घेतली.
![Trending : मला कोरोना झालाय, रजा हवी, गंडवणाऱ्या महिलेला बॉसकडून मोठी शिक्षा woman took leave say i am corona positive boss fired when the truth came out Trending : मला कोरोना झालाय, रजा हवी, गंडवणाऱ्या महिलेला बॉसकडून मोठी शिक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/04/231a22720f685d41e675698fe7ff3146_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Trending News : अनेक वेळा सुट्टी घेण्यासाठी लोक आजारी असल्याचे कारण सांगतात. पोटदुखी, डोकेदुखी किंवा इतर काही आजारांचं कारण सांगून ऑफिसमधून रजा घेण्याचा प्रयत्न लोक करतात. हे कारण खरे असते की खोटे या बाबतचा तपास अनेकवेळा केला जात नाही. त्यामुळे याचा फायदा घेऊन खोटी कारणं सांगून काही लोक रजा घेतात. अशीच एक घटना अमेरिकेमध्ये घडली आहे. अमेरिकेतील (America) एका महिलेनं चक्क तिला कोरोनाची लागण (Corona) झाली आहे, असं खोटं कारण सांगून सुट्टी घेतली. या महिलेचं नाव एली मिडलेटन (Eli Middleton) असं आहे. एलीनं एक टिकटॉक व्हिडीओ शेअर करून माहिती दिली.
'कोरोनाची लागण झाल्याचं खोटं कारण देऊन मी सुट्टी घेतली होती', असं टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एलीनं सांगितलं. सुट्टी घेतल्यानंतर एली नाइट क्लबमध्ये मित्र मैत्रीणींसोबत पार्टी करायला गेली. पण ती पार्टीला गेली आहे हे तिच्या बॉसला कळालं. एलीच्या बॉसनं तिला एक मेसेज केला. या मेसेजमध्ये, 'तु कुठे आहेस?', असे लिहिले होते. तसेच एलीच्या बॉसनं या मेसेजसोबतच एक स्क्रिनशॉट देखील सेंड केला होता.
मेसेज पाहिल्यानंतर एलीनं परत खोटी कारणं द्यायला सुरूवात केली पण एलीच्या बॉसनं तिला नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना सुट्टी घेताना अनेकदा विचार करावा लागणार आहे.
इतर बातम्या :
मुलांना जन्म द्या अन् अकरा लाखांच्या बोनससह एका वर्षाची सुट्टी मिळवा! 'या' कंपनीचा मोठा निर्णय
WFH in Corona : वर्क फ्रॉम होमचं हवं! 82 टक्के लोकांना ऑफिसला परतायची इच्छा नाही, अभ्यासात उघड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)