मुलांना जन्म द्या अन् अकरा लाखांच्या बोनससह एका वर्षाची सुट्टी मिळवा! 'या' कंपनीचा मोठा निर्णय
Trending News : आपले लोकसंख्या धोरण बदलून, चीन आता नागरिकांना अधिक मुले जन्माला घालण्याची ऑफर देत आहे. चीनमध्ये तिसरे अपत्य जन्माला आल्यास लाखो रुपयांचे बक्षीस आणि एका वर्षाची सुट्टी मिळणार आहे.
Trending News : एकीकडे भारतात वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे, तर दुसरीकडे लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असणारा देश चीन आता मुलं जन्माला घालण्यासाठी नागरिकांना ऑफर देत आहे. या नव्या योजनेनुसार चीन नागरिकांना तीन अपत्य जन्माला घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चीनची लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे.
वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे चीन चिंतेत
खरंतर, वाढत्या लोकसंख्येमुळे त्रस्त झाल्याने चीनने एका अपत्याचे धोरण स्वीकारले होते. नव्या पिढीच्या संख्येवर बंधने आली. त्यामुळे आता चीनमध्ये आपल्या एकूण लोकसंख्येमध्ये वृद्धांची संख्या जास्त झाली आहे आणि देशाला काम करणाऱ्या तरुणांच्या कमतरतेची समस्या भेडसावत आहे.
लोकसंख्या वाढवण्यासाठी चीनची नवी योजना
नव्या योजनेनुसार आता चीनमध्ये तीन मुलं जन्माला घालण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे आता देशातील कंपन्याही सरकारच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत असे म्हणावे लागेल. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मुलं जन्माला घालण्यास प्रोत्साहन देत आहे. याशिवाय चीनमधील काही प्रांतांची सरकारेही तिसरे मूल जन्माला घालण्यासाठी बोनस देताना दिसतात. येथे काही स्थानिक सरकारने दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाच्या जन्मावर पैसे देण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी, चीन सरकारने महिलांच्या गर्भधारणेदरम्यान 98 दिवसांच्या मातृत्वाच्या रजेबद्दल सांगितले आहे.
तिसरे अपत्य जन्माला आल्यास मोठं बक्षीस
एका कंपनीकडून मोठी ऑफर देण्यात आली आहे. ज्यानुसार पहिल्या अपत्याचा जन्म झाल्यास 30 हजार युआन (3 लाख 50 हजार रुपये), दूसरे अपत्य जन्माला आल्यास 60 हजार युआन (सुमारे 7 लाख रुपये) आणि तिसरे अपत्य जन्माला आल्यास 90 हजार युआन (सुमारे 11.50 लाख रुपये) बोनस देण्यात येणार आहे.चीनमधील टेक कंपनी Beijing Dabeinong Technology Group कडून कर्मचाऱ्यांसाठी मोठी ऑफर देण्यात आली आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी मोठी ऑफर ठेवली आहे. तिसरे अपत्य जन्माला आल्यास 90 हजार युआन (सुमारे 11.50 लाख रुपये) बोनस देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर कर्मचाऱ्याला एका वर्षाची सुट्टीही देण्यात येणार आहे.
इतर बातम्या :
- बायडेन यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, फोटो शेअर करत दिली माहिती
- WFH in Corona : वर्क फ्रॉम होमचं हवं! 82 टक्के लोकांना ऑफिसला परतायची इच्छा नाही, अभ्यासात उघड
- कॅनडाचे पंतप्रधान अज्ञातवासात, आंदोलक पेटले; काय आहे प्रकरण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha