एक्स्प्लोर
CNN चा सर्वात मोठा सर्वे : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदी?
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना 9 टक्के, सिनेटर एलिझाबेथ वॉरन यांना 8 टक्के जनतेने पसंती दर्शवलीय.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील सर्वात मोठं मीडिया हाऊस म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीएनएनने सर्वात मोठा सर्वे केलाय. अमेरिकेच्या पुढच्या अध्यक्षपदी जनतेची कुणाला पसंती आहे, हे सीएनएनने जाणून घेतले. सर्वेनुसार, सुमारे 42 टक्के अमेरिकन जनतेने ट्रम्पच पुढील अध्यक्षपदाची निवडणूक जिंकतील, असा अंदाज व्यक्त केलाय.
याआधी मार्चमध्येही असाच सर्वे करण्यात आला होता. त्यावेळी 57 टक्के अमेरिकन जनतेने अध्यक्षपदाची पुढील निवडणूक ट्रम्पच जिंकतील, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात सीएनएनने पुन्हा केलेल्या सर्वेमध्येही ट्रम्पनाच पसंती असल्याची दिसून येतंय.
आगामी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडन यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अमेरिकन नागरिकांनी जो बिडन यांनाही मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवलीय. डेमोक्रॅटिक पार्टीत सर्वाधिक पसंतीचे उमेदवारही जो बिडन ठरलेत. त्यांना सुमारे 33 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
सर्वेनुसार, अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना 9 टक्के, सिनेटर एलिझाबेथ वॉरन यांना 8 टक्के जनतेने पसंती दर्शवलीय.
सीएनएन या वृत्तसमूहाने 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान 1,009 सजग नागरिकांशी फोन किंवा प्रत्यक्ष संवाद साधून हा सर्वे केला आहे. एकंदरीत अमेरिकेच्या अध्यक्षपदाची पुढील निवडणूकही रंगतदार होईल, एवढे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement