पाकिस्ताननं लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीमध्ये का उभारलं? राजधानी इस्लामाबादमध्ये मुख्यालय नसण्याचं कारण...
Pakistan : सर्वसाधारणपणे देशाच्या राजधानीत लष्कराचं मुख्यालय असतं मात्र पाकिस्तानमध्ये इस्लामाबादमध्ये लष्कराचं मुख्यालय नाही.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील सैन्य संघर्ष सध्या संपला आहे. भारतानं 7 मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतानं तो परतावून लावला. यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओनं भारताच्या डीजीएमओंना 10 मे रोजी दुपारी 3.35 वाजता फोन करुन शस्त्रसंधीसंदर्भात विनंती केली. भारतानं त्या प्रस्तावावर सहमती दर्शवल्यानंतर सायंकाळी 5.00 वाजल्यापासून शस्त्रसंधी करण्यात आली. पाकिस्तानसोबत सुरु असलेला संघर्ष थांबला.
भारतानं पाकिस्तानच्या रावळपिंडीपर्यंत धडक दिल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. रावळपिंडीमध्ये पाकिस्तानच्या सैन्याचं मुख्यालय आहे. पाकिस्ताननं इस्लामाबाद, लाहोर, कराची सोडून रावळपिंडीमध्ये मुख्यालय बनवलं आहे. याचं नेमकं कारण काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
ब्रिटीशांच्या काळात ब्रिटीश सैन्याच्या उत्तरेकडील कमांडचं केंद्र रावळपिंडी होतं. सैन्याला लागणारी शस्त्रास्त्र पहिल्यांदा तितं उपलब्ध व्हायची. 1974 मध्ये भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले तेव्हा पाकिस्ताननं रावळपिंडीतील ब्रिटीश सैन्याच्या साधनांचा वापर करण्यास सुरुवात केली. रावळपिडींलाच त्यांनी मुख्यालय केलं. वर्षानुवर्षे पाकिस्तानच्या सैन्याचं मुख्यालय रावळपिंडीमध्ये आहे.
सर्वसाधारणपणे सैन्याचं मुख्यालय राजधानी असलेल्या शहरात किंवा त्याच्या जवळ असतं. मात्र, पाकिस्तानमध्ये असं घडलं नाही. 1960 मध्ये पाकिस्ताननं इस्लामाबादला स्थायी राजधानी जाहीर केलं. तेव्हापासून आतापर्यंत सैन्याचं मुख्यालय पाकिस्ताननं हलवलं नाही. 1947 ते 1960 च्या काळात पाकिस्ताननं रावळपिडींत मुख्यालय मजबूत केलं. तेथील शस्त्रांचा साठा वाढवला. रावळपिंडीतून सैन्याचं मुख्यालय इस्लामाबादला शिफ्ट करण्यास मोठा आर्थिक खर्च लागला असता. पाकिस्तानची त्यावेळी आर्थिक स्थिती नव्हती. त्यामुळं इस्लामाबाद, लाहोर किंवा कराची शहराची निवड करण्यात आली नाही.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झालेली असली तरी भारतानं दहशतवादाची कृती युद्धाची कृती समजली जाईल अशी भूमिका घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तिसऱ्या देशाची मध्यस्थी गरजेची नाही, असं देखील भारतानं म्हटलंय. भारतानं यापुढं गोळीचं उत्तर गोळ्यानं दिलं जाईल असं देखील म्हटलं. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नसल्याचं देखील हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. भारताच्या डीजीएमओ आणि तिन्ही सैन्यदलांच्या अधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली.
इतर बातम्या :























