Elon Musk म्हणाले, काही दिवस असं वाटलं की, मी मरण यातनाच सोसतोय; पण का?
एलन मस्क यांनी ट्वीट करून कोविड लसीच्या दुसऱ्या बूस्टर डोसबाबत त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, बूस्टर डोस घेतल्यानंतर मला वाटलं की मी मरण यातना भोगतोय.
Elon Musk Tweet on Covid-19 Booster Dose: ट्विटरची (Twitter) सूत्रं हाती घेतल्यापासून एलन मस्क (Elon Musk) चर्चेत आहे. ट्विटरबाबत घेतलेल्या नव्या निर्णयांमुळे कधी त्यांच्यावर टीका झाली, तर कधी त्यांची प्रशंसा झाली. एलन मस्क नेहमीच आपल्या हटेक ट्वीटसाठी चर्चेत असतात. पुन्हा एकदा मस्क यांनी आपल्या ट्वीटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी व्यवसायाशी किंवा ट्विटरसंदर्भात काहीही ट्वीट केलेलं नाही. उलट कोरोना व्हायरसच्या बूस्टर डोसवर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, एलन मस्क यांनी कोविड लसीच्या दुसऱ्या बूस्टर डोसबाबत त्यांचा अनुभव शेअर करताना ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये मस्क म्हणालेत की, बूस्टर डोस घेतल्यानंतर मला वाटलं की, मी मरण यातना भोगतोय. विशेष म्हणजे, अलीकडच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोरोना व्हायरसच्या लसींच्या गंभीर दुष्परिणामांची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एलन मस्क यांनीही आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे.
मस्क यांनी ट्वीट करत म्हटलंय की, पहिला mRNA बूस्टर डोस ठीक होता, पण दुसऱ्यानं मला त्रास झाला. मस्क यांनी कोरोना लशींच्या साईड इफेक्टबाबत ट्वीट केलं. त्यांनी म्हटलंय की, कोरोनाचा दुसरा बूस्टर डोस घेतल्यानंतर लसीच्या काही साईड इफेक्ट्सचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मला असं वाटलं होतं की, मी मरण यातनाच भोगतोय.
How do we interpret this? https://t.co/QtLFpactc2
— Scott Adams (@ScottAdamsSays) January 20, 2023
असं वाटत होतं की, मी मरण यातना भोगतोय : एलन मस्क
एलन मस्क यांनी ट्वीट केलं की, माझ्या दुसऱ्या बूस्टर शॉटचे मला खूप दुष्परिणाम सोसावे लागले. त्यावेळी असं वाटलं की, मी कित्येक दिवस मरण यातना भोगतोय.. दुसरा बूस्टर डोस घेण्याच्या प्रश्नावर मस्क म्हणाले की, मला बर्लिनला जायचं होतं आणि अशा परिस्थितीत माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. यामुळे मला दुसरा बूस्टर डोस घ्यावा लागला.
दरम्यान, एलन मस्क नेहमीच आपली मतं मांडत असतात. बहुतेक मुद्द्यांवर ते आपली बाजू सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन सर्वांसमोर मांडत असतात. अलीकडच्या काळात मस्क कोविड लसीच्या दुष्परिणामांवर बोलत आहेत. याचसंदर्भात त्यांनी ट्वीट केलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या :