Corona Vaccine: WHO ने दिली अॅस्ट्राजेनका लसीच्या आपातकालीन वापराला मंजूरी
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाकडून विकसित करण्यात येणाऱ्या कोरोना अॅस्ट्राजेनका (astrazeneca) लसीला जागतिक आरोग्य संघटननेने (WHO)आपातकालीन वापराला मंजूरी दिली आहे. ज्या देशात कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे त्या ठिकाणी याचा वापर केला जाऊ शकतो.
नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटननेनं सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाकडून विकसित करण्यात येणाऱ्या कोविशिल्डच्या आपातकालीन वापराला मंजूरी दिली आहे. WHO ने कोव्हॅक्स प्रोग्रॅम अंतर्गत कोविशिल्डच्या वापराला मंजूरी दिली आहे. WHO च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्या देशात कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे त्या ठिकाणी याचा वापर केला जाऊ शकतो.
कोविशिल्डचे उत्पादन भारतात सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाकडून केलं जात आहे. भारतासहित अनेक देशांत लसीकरणाच्या कार्यक्रमात या लसीच्या वापराला मंजूरी देण्यात आली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या या निर्णयामुळे कोविशिल्डच्या या लसीचा वापर जगातील कोणत्याही देशात होऊ शकतो.
बीएमसीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला 3 संधी, त्यानंतर मोफत लसीकरणाच्या यादीतून नाव वगळणार
जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हॅक्स कार्यक्रमाच्या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास देशात कोरोना लस पोहचवली जात आहे. या देशात कोरोनाची लस उत्पादित होत नाही. त्यामुळे त्याचा फटका गरीब देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमावर होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार अजूनही जगातील असे 29 मागासलेले देश आहेत की त्या देशात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु झाला नाही.
त्यामुळे अशा देशात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना पुढाकार घेत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणत्याही कोरोना लसीच्या वापराला मंजूरी देण्यापूर्वी त्या लसीची गुणवत्ता आणि सुरक्षितता याचा अभ्यास केला जातो. एकदा का जागतिक आरोग्य संघटनेने अशा प्रकारची परवानगी दिली की कोणताही देश त्या लसीचा वापर आपल्या लसीकरणासाठी करु शकतो.
Corona Alert | कोरोना फोफावतोय, कठोर निर्णय घ्यावे लागतील; अजित पवारांचे संकेत