एक्स्प्लोर

Washington Shooting : डोनाल्ड ट्रम्प गोळीबारातून पुन्हा एकदा बचावले, आरोपी अटकेत; व्हाइट हाऊसमधील थराराची टाईमलाईन

Donald Trump Attack : वॉशिंग्टन डीसीतील व्हाइट हाऊस कॉरेस्पोंडेंट्स डिनरदरम्यान गोळीबाराची घटना घडली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Washington Donald Trump Attack : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये आयोजित व्हाइट हाऊस कॉरेस्पोंडेंट्स डिनरदरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली असून कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर सीक्रेट सर्व्हिसच्या एजंटांनी तात्काळ हालचाल करत ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवले. काही वेळातच संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Washington Shooting : नेमकं काय घडलं?

अमेरिकेच्या वॉशिंग्टन हिल्टनमध्ये 'व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनर'साठी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया उपस्थित होते... राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत डिनर कार्यक्रम सुरु होता.. अचानक ट्रम्प यांच्या अगदी समोर गोळीबार झाला... बँक्वेट हॉलमध्ये एकामागोमाग एक गोळ्यांचा आवाज येऊ लागला... ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीनं ट्रम्प यांना घेराव घातला आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढलं.. शिवाय उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्यासह एफबीआयचे संचालक काश पटेल यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना खोलीतून तातडीनं बाहेर काढण्यात आलं..यानंतर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर संशयित हल्लेखोराचा फोटो शेअर केला

Shooting Timeline : हल्ल्याची संपूर्ण टाइमलाइन

रात्री 8:35 वाजता : पहिल्या गोळीबाराचा आवाज

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भाषण सुरू करण्याच्या तयारीत असतानाच अचानक गोळीबार झाला. हॉलमधील उपस्थितांना तात्काळ जमिनीवर लेटण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Rescue Operation : व्हीआयपींची सुरक्षित सुटका

गोळीबार सुरू होताच सीक्रेट सर्व्हिसने डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस आणि इतर मान्यवरांना सुरक्षित बाहेर काढले. एजंटांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Accused Arrest : संशयित अटकेत

घटनेनंतर काही वेळातच कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी संशयिताला अटक केली. त्याच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

Trump Reaction : ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

रात्री 9:17 वाजता ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत सीक्रेट सर्व्हिसच्या धाडसाचं कौतुक केलं आणि आरोपी अटकेत असल्याची पुष्टी केली. त्यानंतर त्यांनी आपत्कालीन पत्रकार परिषद जाहीर केली.

Investigation Update : तपास सुरू, गंभीर गुन्हे दाखल

एफबीआयने या घटनेचा तपास सुरू केला असून आरोपीवर विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Security Concern : सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर अमेरिकेतील उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षा अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget