Viral Video : ब्रिटनमध्ये परेडदरम्यान रॉयल गार्डने चिमुकल्याला पायदळी तुडवले, व्हिडीओ व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक शाहीसैनिक मुलाला पायदळी चिरडून पुढे सरकताना पाहायला मिळतोय.
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ ब्रिटनच्या राणीच्या शाहीरक्षक (Royal Guard) चा आहे. व्हिडिओमध्ये रॉयल गार्डचे दोन सैनिक ब्रिटनच्या टॉवर ऑफ लंडनकडे कूच करताना दिसत आहेत. रॉयल गार्डचे दोन सैनिक करड्या रंगाचा गणवेश आणि टोपी घालून कूच करत आहेत. अचानक एक मूल सैनिकाच्या वाटेआड येते. दोन शाही सैनिकांपैकी एक सैनिक मुलाला पायदळी चिरडून पुढे सरकतो.
ब्रिटनमधील व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये दोन शाही रक्षक ब्रिटनच्या टॉवर ऑफ लंडनकडे कूच करताना दिसत आहेत. परेडदरम्यान एका रक्षकाची एका चिमुकल्या मुलाशी टक्कर झाली. कूच करणार्यांपैकी एक रक्षक त्या मुलाच्या अंगावर पाय ठेवून पुढे निघून जाताना दिसला. मुलाला पायदळी तुडवताना सैनिक आपले कर्तव्य कसे करत राहिला हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये आरडाओरडाही ऐकू येत आहे. गार्डला टक्कर दिल्यानंतर मूल लगेच उठते. त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
🚨 | WATCH: A kid gets trampled by the queen’s guards pic.twitter.com/xzv7W8I2F5
— News For All (@NewsForAIl) December 29, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ यापूर्वी निनावीपणे टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. नंतर हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. हा व्हिडीओ ट्विटरवर दोन दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेला आहे. या घटनेनंतर गार्डने मुलाची तपासणी करून सर्व काही ठीक असल्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, टॉवर ऑफ लंडनमध्ये नियमित गस्तीदरम्यान घडलेल्या घटनेची माहिती आहे.
इतर बातम्या :
- Kim Jong Un पुन्हा चर्चेत, नवा लूक पाहून लोकं हैराण
- Omicron : ओमायक्रॉनचा धोका वाढताच, राज्यात सर्वाधिक 125 रुग्ण, जाणून घ्या राज्यनिहाय आकडेवारी4
- Liger : 'लायगर' सिनेमाची पहिली झलक, विजय देवरकोंडाचा अनोखा अंदाज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha