Kim Jong Un पुन्हा चर्चेत, नवा लूक पाहून लोकं हैराण
Kim Jong Un Looks : उत्तर कोरियाचा (North Korean) हुकूमशाह किम जोंग उन पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
Kim Jong Un Looks : जगातील क्रूर हुकूमशाहांपैकी एक असलेला उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) हा विचित्र नियम लागू करण्यासाठी चर्चेत असतो. अलीकडेच, त्यांचे वडील आणि देशाचे माजी शासक किम जोंग इल यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी देशातील लोकांना 11 दिवस हसणे, मद्यपान करणे, पार्टी करणे, खरेदी करणे इत्यादींवर बंदी घातली आहे.
20 किलो वजन केले कमी
उत्तर कोरियाच्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने पूर्वी, म्हणजे 28 डिसेंबर रोजी उत्तर कोरियाच्या सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या केंद्रीय समितीच्या बैठकीदरम्यान एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये किम जोंग-उन खूपच बारीक दिसत होते. फोटोत त्याच्या चेहऱ्यावर बदल स्पष्ट दिसत होता. फोटोमध्ये किम जोंग-उनचे वजन कमी झाल्याचं दिसत आहे. रिपोर्टनुसार, त्याचे वजन किमान 20 किलो म्हणजेच 44 पौंडांनी कमी झाले आहे. याआधीही तो त्याच्या घटत्या वजनामुळे चर्चेत आला होता.
किम जोंग-उनचे वजन कमी झाल्यामुळे अलीकडेच त्याच्या तब्येतीबद्दल जगभरात चर्चा सुरू झाली होती. याबाबत अधिकाऱ्यांनीही दावा केला आहे की, किम पूर्णपणे निरोगी आहे. त्याचबरोबर पक्षाच्या बैठकीत किम जोंग उन दिसल्यानंतर त्याच्याबाबतच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
नागरिकांनी कमी अन्न खाण्याचे आवाहन
उत्तर कोरियामध्ये अन्नाच्या कमतरतेमुळे किम जोंगउनने जेवण कमी केल्याचे सांगितले जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, किम जोंग-उनने आपल्या नागरिकांनाही परिस्थिती सामान्य होईपर्यंत कमी अन्न खाण्याचे आवाहन केले आहे.
सुमारे 860,000 टन अन्नधान्याची कमतरता
ऑक्टोबरमध्ये किम जोंगउनने देशातील नागरिकांना आवाहन केले होते की, जोपर्यंत उत्तर कोरिया 2025 मध्ये चीनसोबतची सीमा पुन्हा उघडत नाही, तोपर्यंत लोकांना कमी अन्न खावे लागेल. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने अंदाज व्यक्त केला आहे की, उत्तर कोरियामध्ये यावर्षी सुमारे 860,000 टन अन्नाची कमतरता आहे.
इतर बातम्या :
- Skin Care Tips : वाफ घेण्याचे अनेक फायदे, 'या' समस्या होतील दूर
- Calcium Rich Food : कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
- तुम्हाला नंबरचा चष्मा आहे? नंबर कमी करण्याचे 'हे' उपाय करुन बघा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha