Taliban News | समलिंगी व्यक्तीला मारहाण करत तालिबान्यांचा बलात्कार, ते इथेच थांबले नाही..
दिवसेंदिवस तालिबान्यांचा क्रूर चेहरा समोर येत आहे. अशीच एक घटना काबूल शहरात घडली आहे. तालिबान्यांनी एका समलिंगी व्यक्तीला मारहाण करत बलात्कार केला आहे.
तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यापासून अनेक भयानक घटना घडत आहे. लोकं देश सोडून पळून जात आहेत. या काळात अनेक लोकांचा वेदनादायक मृत्यू झाला आहे. तालिबानच्या राजवटीत सर्वात मोठा धोका स्त्रियांना आहे, ज्या भयभीत होऊन स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत तालिबान्यांचा पुन्हा एकदा क्रूर चेहरा समोर आला आहे. ज्यावरून असे दिसून येतंय की केवळ महिलाच नाही, समलिंगी समुदायाचे लोक (LGBTQ Community) देखील तालिबानी राजवटीत धोक्यात आहेत.
डेली मेलच्या अहवालानुसार, काही तालिबान्यांनी एका समलिंगी व्यक्तीला मारहाण केली आणि नंतर त्याच्यावर बलात्कार केला. हे नराधम तिथेच थांबले नाही, त्यांनी त्या पीडित व्यक्तीकडून त्याच्या वडिलांचा नंबर घेतला आणि त्यांना फोन करुन त्यांचा मुलगा समलिंगी असल्याचे सांगितले. ही संपूर्ण बाब अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये घडली आहे. अहवालांनुसार, अनेक समलिंगी लोकांना अफगाणिस्तानमध्ये त्यांची ओळख लपवण्यास भाग पडत आहे. कारण त्यांना तालिबानकडून मोठा धोका आहे. तालिबान समलैंगिक लोकांच्या जीवावर उठल्याचे सांगितले जात आहे.
अत्याचाराचे असेच एक प्रकरण समोर आले आहे. अहवालानुसार, दोन तालिबानी अतिरेक्यांनी एका समलिंगी माणसाशी मैत्रीचे नाटक केले आणि नंतर त्यांना भेटण्यासाठी आमंत्रित केले. सदर व्यक्ती आपल्या घरातच बसून राहायचा. जेव्हा त्याचा तालिबानवर विश्वास बसला तेव्हा तो त्यांना भेटायला गेला, पण दोघांनी त्याला भेटताच खूप मारहाण केली आणि नंतर त्याच्यावर बलात्कार केला. यानंतर, त्यांनी त्या व्यक्तीला त्याच्या वडिलांचा नंबर विचारला जेणेकरून ते त्याला सांगू शकेल की त्याचा मुलगा समलिंगी आहे.
अहवालानुसार, या घटनेचा खुलासा अफगाणिस्तानमधील मानवी हक्कांचे कार्यकर्ते आर्टेमिस अकबरी यांनी केला आहे, जे तुर्कीमध्ये राहत आहेत. मात्र, पीडित व्यक्तीच्या संपर्कात आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, तालिबानी राजवटीत समलिंगी लोकांचे जीवन किती कठीण आहे हे जाणून घेण्यासाठी अशी घटना हे फक्त एक छोटे उदाहरण आहे. तालीबानी फक्त जगाला दाखवतायेत ते बदलले आहे. मात्र, प्रत्यक्षात तसं काहीही नाही.