Viral News : 26 वर्षांच्या मुलाला पाठीवर घेऊन जग फिरणारी आई, 'हे' आहे कारण
Viral News : 26 वर्षाच्या मुलाला पाठीवर घेऊन एक आई जग फिरत आहे. या महिलेचे मूल जन्मापासूनच अंध असून इतरही अनेक शारीरिक समस्यांनी ग्रस्त आहे.
Mother carrying son on back : आईला जगातील सर्वात महान योद्धा मानले जाते. आई आपल्या मुलांच्या भल्यासाठी प्रत्येक संकटाला तोंड द्यायला तयार असते. आईची मुलांसाठी काहीही करायची तयारी असते. ऑस्ट्रेलियाचे एक प्रकरण समोर आले आहे जिथे एका आईने आपल्या मुलासाठी जे केले ते खूप प्रेरणादायी आहे. ऑस्ट्रेलियात राहणारी एक महिला तिच्या 26 वर्षांच्या मुलाला पाठीवर घेऊन जग फिरत आहे. आता तुम्हाला नक्कीच असं का असा प्रश्न पडला असेल. तर, यामागचे कारण अतिशय भावनिक आहे. खरंतर या महिलेचे मूल लहानपणापासूनच आंधळे आहे. या मुलाचा जग फिरवण्याची त्याच्या आईची इच्छा आहे.
26 वर्षांच्या मुलाला पाठीवर फिरवणारी महिला
ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे राहणारा 26 वर्षीय जिमी अंतराम लहानपणापासून अंध असून इतर शारीरिक समस्यांनी त्रस्त आहे. अंध असूनही त्यांनी जगभर प्रवास केला आहे. जिमीने त्याची आई निक्की अंतरामच्या पाठीवर बसून जग फिरलं आहे. खरंतर, वयाच्या 17 व्या वर्षी आई झालेल्या निक्कीला जेव्हा समजले की तिचा मुलगा पाहू शकत नाही, तेव्हा तिने स्वतःला वचन दिले की ती आपल्या मुलाला संपूर्ण जग दाखवेल. ऑस्ट्रेलियात राहणारी निक्की सध्या 43 वर्षांची आहे. या दोघांनी आतापर्यंत हवाई, बाली आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनेक ठिकाणी फिरले असून आता ते कॅनडाला जाण्याचा विचार करत आहेत.
निक्की म्हणाली की आता तिचे वय वाढत आहे आणि जिमीला तिच्या पाठीवर बसवून फिरवणे खूप त्रासदायक आणि थकवणारं आहे. मात्र तिच्या मुलासाठी ती हे करत आहे. तिने सांगितले की, जिमीच्या अंधत्वाची माहिती तो फक्त दोन महिन्यांचा असताना कळली. जिमीच्या आजीच्या लक्षात आले की तो खेळण्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांना समजले की जिमीला एपिलेप्सी (Epilepsy) आहे. मात्र वर्षानुवर्षे उपचार घेतल्यानंतर परिणाम न झाल्याने एपिलेप्सीचे औषध बंद करण्यात आले.
लहानपणापासूनच अंध आहे जिमी
निक्कीने सांगितले की, जिमी जन्मापासूनच अंध आहे आणि त्याला इतर काही शारीरिक समस्या आहेत, ज्यामुळे त्याला 24 तास काळजी घेणे आवश्यक आहे. निक्की सर्व सुट्ट्यांसाठी योजना तयार करते आणि त्यानुसार जिमीला दौऱ्यावर घेऊन जाते. निक्की म्हणते, "जिमी माझी प्रेरणा आहे. मी त्याच्याकडे पाहते, तो नेहमी आनंदी, हसत असतो. तो मला त्याच्या स्वत: च्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु मला खात्री आहे की जिमी मला त्याच्या मनात माझा विचार करतो आणि मला पाहतो.''
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Republic Day 2022 : टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पदक विजेत्यांनी गायलं राष्ट्रगीत, व्हिडिओ व्हायरल
- UAE Missile Attack : यूएईने अबू धाबीवरील क्षेपणास्त्र हल्ल्याचा डाव उधळला; हल्लेखोरांना इशारा
- Joe Biden : 'या' प्रश्नावर बिथरले राष्ट्राध्यक्ष बायडेन, माइकवरच पत्रकाराला हासडली शिवी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha