एक्स्प्लोर

Uzbekistan Cough Syrup Death: 'भारतीय कंपनी मॅरियन बायोटेकचं कफ सिरप मुलांना देऊ नका', WHO चा इशारा

WHO on Uzbekistan Cough Syrup Death: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उझबेकिस्तानने (Uzbekistan) मॅरियन बायोटेकनं (Marion Biotech) बनवलेले कफ सिरप प्यायल्याने 19 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता.

WHO on Uzbekistan Cough Syrup Death: उझबेकिस्तानमध्ये (Uzbekistan) कथितरित्या भारतीय कफ सिरपच्या (Cough Syrup) सेवनानंतर 19 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) भारतीय कफ सिरपच्या वापराबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) उझबेकिस्तानच्या अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या संपर्कात असून या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे. नोएडास्थित कंपनी मॅरियन बायोटेकनं (Marion Biotech) बनवलेले दोन कफ सिरपचा वापर करणं टाळावं, अशा इशारा डब्ल्यूएचओनं दिला आहे. 

उझबेकिस्तान (Uzbekistan) सरकारनं नोएडास्थित मॅरियन बायोटेकचं खोकल्यावरील सिरप 'डॉक-1 मॅक्स'ला मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे. आतापर्यंत मॅरियन बायोटेकनं डब्ल्यूएचओला या उत्पादनांच्या सुरक्षिततेची आणि गुणवत्तेची हमी दिलेली नाही, असं सांगितलं जात आहे. 

कफ सिरपबद्दल WHO कडून इशारा 

जागतिक आरोग्य संघटनेनं बुधवारी (11 जानेवारी) उझबेकिस्तानमधील मुलांसाठी दोन भारतीय कफ सिरप - एम्ब्रोनोल सिरप (Ambronol Syrup) आणि डॉक-1 मॅक्स सिरप - वापरू नयेत, अशी शिफारस केली आहे. मॅरियन बायोटेकद्वारे उत्पादित कफ सिरप ही गुणवत्ता मानकांची पूर्तता न करणारी उत्पादने असल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. प्रयोगशाळेच्या विश्लेषणात दोन्ही उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकोल हे दोन्ही घातक पदार्थ आढळून आले आहेत.

उझबेकिस्तानचा दावा

उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं विश्लेषण करताना दावा केला आहे की, भारतीय कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल हा विषारी पदार्थ आहे. असं म्हटलं जातं की, मुलांना प्रमाणापेक्षा या सिरपचा जास्त डोस देणं अत्यंत धोकादायक आहे. उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं होतं की, त्यांच्या देशातील मुलांनी नोएडास्थित मॅरियन बायोटेकचे 'डॉक-1 मॅक्स' कफ सिरपचं सेवन केलं होतं. त्यानंतर त्या मुलांचा मृत्यू झाला होता.

भारतातही विकले जातायत हे दोन्ही सिरप? 

उझबेकिस्तानमधील 19 मुलांचा मृत्यू भारतीय कफ सिरपमुळेच झाल्याचा दावा वारंवार केला जात आहे. आता भारत सरकारनंही याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या सूत्रांनी सांगितले होते की, हे सिरप सध्या भारतीय बाजारात विकलं जात नाहीये.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, यूपी ड्रग कंट्रोलर आणि सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) नं या प्रकरणी तपास सुरू केला आहे. सिरपचे नमुने चंदीगढला पाठवण्यात आले आहेत.

गाम्बियामध्ये भारतीय सिरपमुळे 60 मुलांचा मृत्यू 

डॉक -1 मॅक्स सिरप (Doc-1 Max Syrup) मध्ये इथिलीन ग्लायकॉलची उपस्थिती असल्याचं दर्शविलं जात आहे. काही दिवसांपूर्वी याच घातक केमिकलमुळे गाम्बियामध्ये लहान मुलांचा मृत्यू झाला होता. 2022 मध्ये आफ्रिकन देश गाम्बियामध्ये 2022 मध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या कफ सिरपमुळे 60 हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर केंद्र सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. परंतु, भारतीय सिरपमुळेच गाम्बियामध्ये लहान मुलांचा मृत्यू झाल्याची अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकारSharad Pawar  on Anil Deshmukh :  अनिल देशमुखांच्या कारवर हल्ला; शरद पवार काय म्हणाले ?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  8 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Embed widget