एक्स्प्लोर
Advertisement
अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकाची गोळ्या झाडून हत्या
न्यूयॉर्क : अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनामध्ये एका भारतीय वंशाच्या नागरिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हरनिश पटेल असं या 43 वर्षीय नागरिकाचं नाव आहे. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वंशभेदातून होणाऱ्या हत्यांचा निषेध केला होता.
दक्षिण अमेरिकेच्या लँकेस्टर काऊंटीमध्ये 43 वर्षीय हरनिश पटेल यांचं दुकान होतं. गुरुवारी घराबाहेरील यार्डमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या अंगावर बंदुकीच्या गोळ्यांमुळे जखमा झाल्याचं निष्पन्न झालं होतं. हत्येपूर्वी 10 मिनिटं आधीच पटेल यांनी आपलं दुकान बंद केलं होतं. दुकान बंद करुन मिनीव्हॅननं जवळच असलेल्या आपल्या घरी निघाले होते. घराजवळ पोचताच मारेकऱ्याशी त्यांची झटापट झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
हत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. उद्योजक पटेल यांच्या हत्येप्रकरणाचा तपास सुरु आहे, असं लॅँकेस्टर येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. ही हत्या वंशभेदातून झाली नसावी, असं पोलीस प्रमुख बॅरी फेली यांनी स्पष्ट केले आहे. गेल्याच आठवड्यात कन्सासमध्ये श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाली होती. ही हत्या वंशभेदातून झाल्याचे स्पष्ट झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement