एक्स्प्लोर
अमेरिकेत सात मुस्लीमबहूल देशातील नागरिकांना 'नो एंट्री' कायम
वॉशिंग्टन : सीरियासह सात मुस्लीमबहुल देशातील निर्वासितांना 90 दिवसांसाठी बंदी घालण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलं आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजयच झाला आहे. जानेवारीमध्ये ट्रम्प यांनी ही 90 दिवसांची बंदी घातली होती. मात्र या निर्णयाविरोधात अनेकांनी कोर्टात धाव घेतली होती.
मुस्लीमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एंट्री : ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात देशातील मुस्लिमांच्या प्रवेश बंदीबाबत जारी केलेल्या आदेशाला सियाटल कोर्टानं हंगामी स्थगिती दिली होती. ज्यांच्याकडे अमेरिकेचा व्हिसा आहे, ते अमेरिकेत प्रवेश करु शकतात, असं मत न्यायालयानं नोंदवलं होतं.
ट्रम्प यांच्या मुस्लिमांना देशबंदीच्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती
अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि मिनेसोट राज्यातून या अध्यादेशाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी स्थानिक जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जेम्स रॉबर्ट यांच्यासमोर सुनावणी सुरु होती. यावेळी न्यायमूर्ती रॉबर्ट यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाला स्थगिती दिली.
न्यायमूर्ती रॉबर्ट यांनी यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात 9/11 च्या हल्ल्यानंतर बंदी घातलेल्या कोणत्या देशांनी हल्ला केला होता? असा प्रश्न सरकारी वकील बेनेट यांना विचारला. त्यावेळी बेनेट यांनी आपल्याला याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे जर याचे उत्तर माहित नसेल, तर या देशातील नागरिकांमुळे अमेरिकेला धोका आहे असं म्हणणं चुकीचं आहे. तसेच याला नागरिकांचेही समर्थन नसल्याचं निकालपत्रात म्हणलं होतं.
ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणावर फेसबुक, गुगल, अॅपलचं टीकास्त्र
मागच्याच आठवड्यात ट्रम्प यांनी कोर्टानं मान्यता दिल्यानंतर 72 तासांमध्ये ही बंदी लागू करण्यात येईल असं स्पष्ट केलं होतं. आता कोर्टानं मान्यता दिल्यामुळे ट्रम्प यांचा विजय झाला आहे, तसंच मुस्लीमबहुल देशांतील निर्वासितांवर 90 दिवसांसाठी बंदी लादण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इराणचं अमेरिकेला जशास तसं उत्तर, अमेरिकन नागरिकांना इराणमध्ये ‘नो एंट्री’
ट्रम्प यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर इराण, सीरिया, सूदान, सोमालिया लीबिया, आणि येमेन या मुस्लीमबहुल देशातील नागरिकांवर जानेवारीत बंदी घातली होती. त्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वत्र विरोध झाला. या निर्णयामुळे अनेक प्रवाशांचा व्हिसा एकाएक रद्द झाल्याने गोंधळात पडले होते.
डोनाल्ड ट्रम्प आता पाकिस्तानवरही बंदी घालणार?
अमेरिकन सरकारच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार, ''आम्ही व्हिसासंदर्भातील निर्णयात बदल केला असून, ज्यांनी आपला व्हिसा रद्द केला नसेल, ते अमेरिकेत प्रवास करु शकतात. त्यांचा व्हिसा ग्राह्य मानण्यात येईल.'' असं सांगितलं. पण ट्रम्प यांच्या आदेशामुळे सात मुस्लीमबहुल देशातील जवळपास 60 हजार नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement