एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: अनेकांना वाटलं माझी राख होईल पण प्रत्येकवेळी मी भरारी घेतलेय: देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील मराठा आंदोलन अवघड जाईल, असा अनेकांचा कयास होता. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत कुशलतेने ही परिस्थिती हाताळली.

Devendra Fadnavis in Mumbai: राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या, असे प्रतिपदान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठी पत्रकार संघातर्फे सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर  यांच्या हस्ते फिनिक्स पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिनिक्स पुरस्काराविषयी बोलताना मिश्किल टिप्पणी केली. अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होतेय आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतलेय, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

तुम्ही मला फिनिक्स पुरस्कार दिला म्हणजे मी काही राखेतून उभा राहिलेलो नाही. अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होतेय आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली आहे. ही भरारी मी घेऊ शकलो कारण, मी कधी आव्हानांपासून पळालो नाही, आव्हानांना सामोरा गेलो, आव्हानांचा सकारात्मकतेने सामना केला. राख होण्याचा क्षण आला तेव्हा प्रत्येकवेळी सकारात्मकतेने पुढे गेलो. माणसांचा कधी द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत किंवा टोकाचं राजकारण केलं नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले आहे, हे बघण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो, असेही त्यांनी म्हटले.

काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठे आंदोलन झाले होते. हजारो मराठा आंदोलक मुंबईत ठाण मांडून बसल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. ते ही परिस्थिती कशी हाताळणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यामार्फत मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे सोडवला होता. त्यामुळे मराठा आंदोलकांनी मुंबईतून माघार घेतली होती. हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठे यश मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच राज्यातील प्रमुख मराठी, इंग्रजी, हिंदी दैनिकांमध्ये 'देवाभाऊ' या नावाने जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. सोशल मीडियावरही ही जाहिरातबाजी करण्यात आली होती. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात मराठा समाजाला न्याय मिळाल्याची बाब ठसवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आणखी वाचा

'देवाभाऊ' म्हणत कोट्यवधींच्या निनावी जाहिराती नेमक्या कोणी दिल्या? रोहित पवारांनी उगम शोधून काढला! म्हणाले, मंत्र्यानेच दिल्या, पण...

फडणवीस जाणूनबुजून अडथळे आणतायत, हिंदू धर्माखाली मराठ्यांची अडवणूक का? मनोज जरांगेंचा मोदी-शाहांना सवाल

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : 9605 कोटींचा हिशोब कोण देणार? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल
9605 कोटींचा हिशोब कोण देणार? अपात्र लाभार्थ्यांना निधी वितरण कसं झालं? दोषींवर कारवाई करा: जयंत पाटील
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget