एक्स्प्लोर

Pune Crime news Ayush Komkar: पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट, बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक, पळण्यापूर्वीच मुसक्या आवळल्या

Bandu Andekar Arrest: सोमवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मध्यरात्री उशिरा सहा जणांना अटक केली आहे. यात बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू ही असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे: गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुष क्लासवरून पार्किंगमध्ये आल्यानंतर गोळ्या झाडल्या. यामध्ये आयुषचा मृत्यू झाला, या घटनेनंतर पुणे शहरात पुन्हा टोळायुध्द सुरू झाल्याच्या चर्चा आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाईला सुरूवात केली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा अटक केल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा या ठिकाणी पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. यात बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू ही असल्याची माहिती समोर आली आहे.

बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू ही असल्याची प्राथमिक माहिती

आयुष खून प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा देखील समावेश आहे. आयुषची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली होती. यात प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असलेल्या यश पाटील आणि अमित पाटोळे यांचा देखील समावेश होता. आता या प्रकरणात आणखी सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी मध्यरात्री उशिरा कारवाई करत सहा जणांना अटक केल्याची माहिती आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये नक्की कोण आहेत? याबाबतचा तपशील किंवा त्यांची नावं समोर आलेली नाहीत. मात्र पहाटे पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केल्याचं सांगितलं जात आहे. यात बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू ही असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आयुष कोमकर हत्या प्रकरणी कोणावर गुन्हे दाखल?

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (वय ६०), कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४१), शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय २३), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय १९) अशा १३ जणांचा समावेश आहे.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान मागील वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा बदला या खुनाद्वारे घेण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो क्लासवरून दुचाकीवरून आला त्यावेळी पार्किंगमध्ये त्याच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad News: ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर घुसवला; अडकल्यावर चालक फरार झाला अन्..., वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण; पिंपरीमध्ये नेमकं काय घडलं?
ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर घुसवला; अडकल्यावर चालक फरार झाला अन्..., वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण; पिंपरीमध्ये नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Sunil Sehlke : आमदार सुनील शेळके आणि आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी? आरोप-प्रत्यारोप अन पोलिसात तक्रारी!
आमदार सुनील शेळके आणि आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी?
आमचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेंनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन 
आमचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेंनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Embed widget