(Source: ECI/ABP News/ABP Majha)
US President Joe Biden : जो बायडन कोरोना पॉझिटिव्ह; ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BA.5 ची लागण?
US President Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BA.5 चा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
US President Joe Biden : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (President Joe Biden) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बायडन यांना ओमायक्रॉनचा (Omicron) सब व्हेरियंट BA.5 ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतरही जो बायडन त्यांच्या निवासस्थानातून व्हर्च्युअल माध्यमातून नियोजित बैठकांना उपस्थित राहत आहेत.
राष्ट्रपती जो बायडन यांचे डॉक्टर केविन ओ'कॉनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जो बायडन यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून काही काही टेस्टही करण्यात आल्या. बायडन यांना ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BA.5 ची लागण झाल्याची शक्यता आहे. तसेच, पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, सध्या अमेरिकेतील 75-80 टक्के रुग्णांना ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BA.5 ची लागण झाली आहे. हा SARS-CoV-2 संसर्गाचा प्रकार आहे.
जो बायडन यांची प्रकृती स्थिर
व्हाइट हाऊसचे डॉक्टर केविन ओ'कॉनर यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, बायडन आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. अँटिव्हायरल ट्रिटमेंटनंतर त्यांच्यामध्ये सुधारणा दिसत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्यात अजूनही काही लक्षणं दिसत आहेत. ते घशात खवखव, खोकला आणि अंगदुखी यांसारख्या लक्षणांचा सामना करत आहेत. तसेच, त्यांचा हार्ट रेट आणि ऑक्सिजन लेव्हल पूर्णपणे सामान्य आहे.
आयसोलेशनमध्ये आहेत जो बायडन
कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (President Joe Biden) यांनी एक व्हिडीओ जारी केला. त्यांनी अमेरिकेतील जनतेला आपल्या आरोग्याविषयी माहिती दिली. तसेच, कोरोनाची लागण झाल्यापासूनच ते आयसोलेशनमध्ये (Isolation) आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रोटोकॉलनुसार, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर ते वैयक्तिकरित्या कामावर परत येतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :