(Source: Poll of Polls)
Joe Biden Security: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याआधी का काढली जाते मेंटल हॉस्पिटलमधील रुग्णांची यादी? या मागे आहे धक्कादायक कारण
Joe Biden Security: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याही शहरातील दौऱ्याआधी त्या शहराच्या मेंटल हॉस्पिटलमधील रुग्णांची यादी काढली जाते, या मागे एक जुनं कारण आहे.
US President Joe Biden Security: भारतात (India) होणाऱ्या जी-20 परिषदेसाठी (G20 Summit) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) देखील उपस्थित राहणार आहेत. जो बायडेन येत्या काही दिवसांत त्यांच्या संपूर्ण लवाजम्यासह भारतात येत आहेत. दिल्लीत होणाऱ्या जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी जगातील दिग्गज नेते येत आहेत. यातच आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. जगातील सर्वात बलाढ्य देशाच्या प्रमुखांचं भारतात आगमन होणार आहे, त्यासाठी राजधानी दिल्लीत सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेसंदर्भात काही रंजक तथ्यं आहेत, त्यापैकी एक म्हणजे, जेव्हाही कधी जो बायडन एखाद्या शहराच्या किंवा देशाच्या दौऱ्यावर जातात, त्याआधी शहरातील मेंटल हॉस्पिटलमधील रुग्णांची यादी काढली जाते.
गुप्त एजन्सी करते तपास
सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) हे ज्या कोणत्या शहरात किंवा देशात दौऱ्यावर (Tour) जातात, त्या शहरातील सर्व मेंटल हॉस्पिटलमधील रुग्णांची यादी काढली जाते. ही यादी त्या रुग्णांची (Patient's list) असते, ज्यांना रुग्णालयातून नुकताच डिस्चार्ज दिलेला असतो. अमेरिकेची गुप्त एजन्सी (Secret Agency) अशा रुग्णांची यादी स्वत:कडे ठेवते आणि दौऱ्यादरम्यान बारकाईने अशा रुग्णांवर नजर ठेवते.
मेंटल हॉस्पिटलमधील रुग्णांची यादी का काढली जाते?
आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडत असेल की, मेंटल हॉस्पिटलमधून अशी यादी का काढली जाते? यालाही कारण आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर 1981 साली जीवघेणा हल्ला झाला होता, त्यात हल्लेखोर हा मानसिक रुग्ण होता. जॉन हिंक्ले (John Hinckley) या मनोरुग्णाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर हल्ला केला होता. जॉन हिंक्ले या 35 वर्षीय युवकाला नुकताच मेंटल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. तेव्हापासून अमेरिकेची गुप्त एजन्सी मानसिक रुग्णांवर लक्ष ठेवते. कोणत्याही प्रकारची शंका आल्यास एजंट त्वरित पोलिसांना कळवतात.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी अशा इतर अनेक व्यवस्था केल्या जातात. जी-20 परिषद सुरू होण्याआधीच जो बायडन यांचे सुरक्षा कर्मचारी दिल्लीत पोहोचले आहेत. बायडन यांच्या दिल्लीला येण्याच्या मार्गाचा, राहणार असलेल्या हॉटेलचा आणि अन्य ठिकाणांचा तपास करतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
World's Oldest Color: जगातील सर्वात जुना रंग कोणता? खूप रंजक आहे याचं उत्तर आणि त्यामागची कहाणी