एक्स्प्लोर

Diwali Celebration At White House : व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन; जो बायडन यांनी साजरा केला दिव्यांचा सण

Diwali Celebration At White House : अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये साजरा करण्यात आली दिवाळी. तब्बल 200 अधिक प्रतिष्ठित भारतीय-अमेरिकन लोकांची उपस्थिती

Diwali Celebration At White House : राज्यासह संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण (Diwali 2022) उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच यंदा तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे. पण फक्त भारतातच (India) नाहीतर जगभरातील अनेक देशांमध्येही दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. साता समुद्रापार असणाऱ्या आणि जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतही (America) दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं (US President Joe Biden) अधिकृत कार्यालय आणि निवासस्थान असणाऱ्या व्हाईट हाऊसमध्ये (White House) जंगी दिवाळी सेलिब्रेशन झालं. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि त्यांच्या पत्नी डॉ. जिल बायडन यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी दिवाळी साजरी (Diwali Celebration) केली. जॉर्ज बुश प्रशासनाच्या काळात व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरु करण्यात आली होती. ती आजतागायत सुरू आहे. अमेरिकेतील राष्ट्रपती भवनाच्या पूर्व कक्षात 200 हून अधिक प्रतिष्ठित भारतीय-अमेरिकन लोकांनी एकत्र येत दिवाळी उत्साहात साजरी केली. व्हाईट हाऊसमधील पूर्व कक्ष हा भारत आणि अमेरिका यांच्याशी संबंधित काही ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार असलेले ठिकाण आहे. याच कक्षात दोन्ही देशांमध्ये अणु करार झाला होता. नोव्हेंबर 2008 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांची संयुक्त पत्रकार परिषदही याच कक्षात झाली होती.  

व्हाईट हाऊसच्या पूर्व कक्षात आयोजित दिवाळी उत्सवात काही आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळाले. ज्यामध्ये सितारवादक ऋषभ शर्मा आणि नृत्य मंडळ 'द सा डान्स कंपनी' यांचाही समावेश आहे. पारंपारिक भारतीय पोशाख जसे की साडी, लेहेंगा आणि शेरवानी परिधान केलेल्या पाहुण्यांनी भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला. व्हाईट हाऊसमधील दिवाळी सेलेब्रेशनसाठी ईस्ट स्टेट डायनिंग रूम पूर्णपणे भरली होती. यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलचे अध्यक्ष अतुल केशप या सेलिब्रेशनसाठी उपस्थित होते. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "भारतीय-अमेरिकन म्हणून येथे येण्याचा मला सन्मान वाटतो. भारतीय-अमेरिकन समुदायानं अमेरिकेत काय साध्य केलंय? हा उत्सव या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. दिवाळीच्या निमित्तानं आपल्यासाठी या उत्सवाचं आयोजन करणं राष्ट्रपती आणि व्हाईट हाऊससाठी एक अद्भूत सन्मान आहे.  

आपल्यापैकी प्रत्येकामध्ये जगाला प्रकाशमान करण्याची ताकद आहे : जो बायडन 

दिवाळी सेलिब्रेशनच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, "तुमच्यासाठी या उत्सवाचं आयोजन करण्याची संधी आम्हाला मिळाली, ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. व्हाईट हाऊसमध्ये साजरी होणारी ही अशा प्रकारची पहिलीच दिवाळी आहे. आज आपल्याकडे पूर्वीपेक्षा जास्त आशियाई-अमेरिकन आहेत. दिवाळी सणाला अमेरिकन संस्कृतीचा भाग बनवल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. दिवाळी आपल्याला आठवण करून देते की, आपल्यापैकी प्रत्येकामध्ये जगाला प्रकाशमान करण्याची ताकद आहे." 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget