इराणवर आर्थिक निर्बंध लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
इराणबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज अमेरिकेन जनतेशी संवाद पत्रकार परिषदेद्वारे संवाद साधला.
वॉशिंग्टन : इराणबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प काय घोषणा करणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष होतं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावांबाबत ही पत्रकार परिषद होती. इराणने केलेल्या युद्धात एकही अमेरिकी सैनिक जखमी नसल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. तसेच इराणला आम्ही अण्वस्त्र तयार करु देणार नसल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बोलताना म्हणाले की, कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्याची अमेरिकन सैन्याची क्षमता आहे. अमेरिकेकडे अधिक अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आहेत. मात्र, आम्हांला शांतता हवी आहे.' तसेच ते पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीयन देशांना इराणविरोधात एकत्र येण्याचे आवाहन देखील केलं आहे. इराणविरोधात केलेल्या कारवाईबाबत बोलताना डोनाल्ड ट्र्म्प यांनी सांगितले की, सुलेमानी यांनी दहशतवाद्यांना पाठबळ दिलं होतं. अमेरिकन नागरिकांचा जीव धोक्यात होता. म्हणूनच त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना सांगितले की, इराणवर आर्थिक निर्बंध घालण्यात येणार आहेत. जोपर्यंत इराण आपली भूमिका बदलत नाही तोपर्यंत त्यांच्यावर लावण्यात आलेले हे निर्बंध तसेच राहतील, असंही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी अमेरिकेच्या सैन्याचं कौतुक केलं आणि म्हणाले, आम्ही दहशतवादी कासिम सुलेमानीला ठार केलं. सुलेमानी अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता. त्याने अमेरिकी सैनिकांच्या हत्येचा कट रचला असून त्यानेच हिजबुल्लाहला पुढे वाढवलं. सुलेमानी याआधीच ठार केलं पाहिजे होतं. ट्रम्प पुढे म्हणाले की, जर्मनी, रूस आणि चीन यांनी आमच्यासोबत यावं लागेल. तसेच ते म्हणाले की, आम्ही अल बगदादीला ठार केलं आणि आयएसआयएसचा खात्मा केला. आता आपल्याला एकत्र येऊन पुढे जाण्याची गरज आहे. मी इराणच्या नेत्यांना सांगू इच्छितो की, जर तुम्हाला उज्वल भविष्य पाहिजे असेल तर शांतीच्या रस्त्यावर चालणं गरजेचं आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांची ही पत्रकार परिषद भारतीय वेळेनुसार 9 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणं अपेक्षित होतं. पण अर्धा तास उशिराने सुरू झाली. तसेच इराणने दावा केला आहे की, त्यांनी अमेरिकेच्या दोन सैनिकी तळांवर हल्ला केला आणि यामध्ये अनेक लोकांनी जीव गमावला आहे.
संबंधित बातम्या :
इराणचा अमेरिकन लष्करी तळांवर मोठा हल्ला, डझनहून अधिक क्षेपणास्र डागली
डॉनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करणाऱ्यास इराणच्या संस्थेकडून 500 कोटींचे बक्षिस