एक्स्प्लोर
सुपरपॉवर अमेरिकेत आजही फ्लॉपी, सरकारचे ताशेरे
मुंबई : कोणे एकेकाळी एका कॉम्प्युटरमधील डेटा दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये नेण्यासाठी किंवा डेटा स्टोरेजसाठी फ्लॉपी डिस्क वापरल्या जायच्या... फ्लॉपी डिस्क आऊटडेट होऊन आता जमाना लोटलाय. कित्येक कॉम्प्युटर्सला आता फ्लॉपी ड्राईव्हही नसतो. कुणाला त्याची आवश्यकताही वाटत नाही. आताच्या फ्लॅश ड्राईव्ह किंवा सीडी वापरणाऱ्यांच्या जमान्यात फ्लॉपीज तर पार विस्मृतीत गेल्या आहेत.
मात्र ज्या अमेरिकेत कॉम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबाबतचे नवनवे शोध लागतात, जी अमेरिका माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपला आदर्श असते, त्याच अमेरिकेत अजूनही काही जण माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी फ्लॉपी डिस्क वापरतात.
फ्लॉपी डिस्क म्हणजे काय हे आताच्या पिढीला आवर्जून सांगावं लागेल. फ्लॉपी डिस्क म्हणजे प्लास्टिकची एक चौकोनी अतिशय लहानशी, पाकिटाच्या आकाराची पेटी.. या फ्लॉपीमध्ये असलेल्या मॅग्नेटिक डिस्क असते, त्यावरच संगणकीय डेटा साठवला जातो.
अमेरिकेच्या संरक्षण खात्यात अजूनही फ्लॉपी डिस्क वापरण्याची सोय असलेले म्हणजे बाबा आदमच्या जमान्यातील कॉम्प्युटर्स वापरात आहेत.
अमेरिकेसारख्या सुपर पॉवर असलेल्या आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत प्रगत समजल्या जात असलेल्या देशाचं संरक्षण मंत्रालयही इतके जुने, जवळजवळ भंगारात काढायच्या लायकीचे कॉम्प्युटर वापरतो, हे ऐकल्यानंतर आश्चर्यचकित व्हायला होतं. अमेरिकी सरकारच्याच गव्हर्नमेंटल अकाऊंटेबिलीटी ऑफिस म्हणजे आपल्याकडील कॅग सारख्या सराकरी विभागाने या आऊटडेट कॉम्प्युटर्सविषयी आपल्या अहवालात ताशेरे ओढलेत.
आंतरखंडीय क्षेत्रणास्त्र भेदी यंत्रणा, अण्वस्त्रे अशा महत्वाच्या आणि अतिशय जोखमीच्या शस्त्रागाराचं नियंत्रण हे 70 च्या दशकातील संगणकाच्या सहाय्याने केलं जात असल्याबद्धल जीएओने ताशेरे ओढलेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement