Pfizer : अमेरिकेत आता 12 ते 15 वयोगटातील बालकांना मिळणार Pfizer-BioNTech ची लस, US FDA ची मंजुरी
अमेरिकेत आता 12 ते 15 वयोगटातील बालकांना Pfizer-BioNTech ची लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. US FDA ने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
वॉशिग्टन : अमेरिकेतील 12 वर्षावरील बालकांना Pfizer-BioNTech ची कोरोना लस देण्यास अन्न आणि औषधं प्रशासनाकडून (FDA) मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेच्या लसीकरणाच्या कार्यक्रमातील आणि कोरोना विरोधातल्या लढ्यातील हा एक महत्वाचा निर्णय आहे. गेल्या आठवड्यात अशा प्रकारची मान्यता देण्याचा प्रस्ताव अन्न आणि औषधं प्रशासनासमोर (FDA) आला होता.
BREAKING: Today, with @BioNTech_Group, we announced @US_FDA expanded the Emergency Use Authorization of our #COVID19 vaccine to adolescents 12 to 15 years of age. Learn more: https://t.co/7C2YfXK868 pic.twitter.com/c69qUmRRzU
— Pfizer Inc. (@pfizer) May 10, 2021
लहान मुलांना कोरोनाची लस देण्यामुळे कोरोनाच्या भविष्यातील लाटेविरोधात संरक्षण मिळेल असा कयास अमेरिकेतील तज्ज्ञांकडून मांडला जातोय. आपल्या मुलांना आता कोरोनाची लस द्यावी असं आवाहनही सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे. अमेरिकेत 12 ते 15 वयोगटातील बालकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या 16 वर्षावरील सर्वांना Pfizer ची लस देण्याच्या निर्णयाला या आधीच मंजुरी मिळाली आहे.
Pfizer कंपनीने 12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास गेल्या महिन्यापूर्वीच केला आहे. त्यामध्ये ही लस बालकांवरही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा दावा Pfizer च्या वतीनं करण्यात आला आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले अमेरिकेतील नागरिक आता विनामास्क घराबाहेर फिरु शकतात. या नागरिकांना छोट्या ग्रुपमध्ये भेटता येईल, परंतु त्यांनी गर्दीची ठिकाणं टाळावीत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन अमेरिकेच्या या संस्थेने गेल्या आठवड्यात हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी कोरोनामुक्त झालेल्या इस्रायलने देखील अशाच प्रकारचं पाऊल उचललं होतं. तिथेही काही नियमांसह विनामास्क घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. इस्रायलमधील सुमारे 60 टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- कोरोना रुग्णांमध्ये Black Fungus संसर्गाचा धोका वाढला, ICMR ने जारी केल्या सूचना
- Petrol Diesel Price : पेट्रोलची शंभरीकडे वाटचाल सुरु, पेट्रोल 26 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी वाढलं
- Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आज राज्यपालांची भेट घेणार!
- Pfizer: अमेरिकेत पुढच्या आठवड्यापासून 12 ते 15 वयोगटातील बालकांना Pfizer ची लस मिळणार, FDA च्या मंजुरीची शक्यता