एक्स्प्लोर

Donald Trump Money Hush: डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ; पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी चालणार खटला, सरेंडर होण्याची शक्यता

Donald Trump Money Hush: डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Donald Trump Money Hush: अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर 2016 मध्ये पॉर्न स्टार डॅनियल स्टॉर्मला बेकायदेशीररित्या पैसे दिल्याचा आरोप आहे. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीनं या प्रकरणाची सुनावणी करताना ट्रम्प यांच्यावरील फौजदारी खटल्याला मंजुरी दिली आहे. म्हणजेच, याप्रकरणी आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला चालणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प स्वतः आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात मंगळवारी (4 एप्रिल) न्यायालयात आत्मसमर्पण करू शकतात. त्यासाठी ते न्यायालयातील अधिकाऱ्यांसमोर स्वत:ची बाजू मांडण्यासाठी हजर राहणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांच्यावर फौजदारी खटला चालवण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नी एल्विन ब्रॅग यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली की, त्यांनी ट्रम्प यांच्या वकिलाशी त्यांच्या आत्मसमर्पण आणि हजर राहण्यासंदर्भातील स्पष्टता मिळवण्यासाठी संपर्क केला होता. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप झाल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी अनेक पावलं उचलावी लागतील. फौजदारी खटल्यादरम्यान बोटांचे ठसे आणि काही फोटो घ्यावे लागतील. त्यांना नाव आणि जन्मतारीख यासंदर्भात संबंधित माहिती शेअर करावी लागेल. खटला सुरू असताना ट्रम्प यांना स्वतःची बाजू मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं जाईल. दरम्यान, खटल्यादरम्यान कोणत्याही आरोपीला अनेक तास कोठडीत ठेवलं जातं. याचाच अर्थ आता डोनाल्ड ट्रम्प यांनाही कोठडीत ठेवलं जाणार आहे.  

प्रकरण नेमकं काय? 

2016च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती मिळत आहे. हे प्रकरण एडल्ट फिल्म स्टारशी संबंधित आहे. ट्रम्प यांचे स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे आणि ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्याचा आरोप आहे. मात्र, येथे मुद्दा पैसे देण्याचा नसून कोणत्या माध्यमातून पैसे देण्यात आले आहे त्यासंदर्भात आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

असा आरोप आहे की, ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी गुप्तपणे डॅनियल्सला पैसे दिले आणि नंतर हे पैसे ट्रम्प यांच्या एका कंपनीने वकीलांना दिले. त्यानंतर ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना या काळात झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरू झाली. ट्रम्प हे 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget