Video : वाढदिवसाची पार्टी अंगलट आली, गोळीबाराचा थरार, 27 जणांना लागल्या गोळ्या, फायरिंगचा आवाज कॅमेऱ्यात कैद
US Crime News: अमेरिकेतील ओहियोमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. अक्रोनमध्ये एका पार्टीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 27 जणांना गोळ्या लागल्या.
US Crime News नवी दिल्ली : अमेरिकेमधील ओहियोमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे या घटनेत अक्रोनमध्ये वाढदिवसाच्या एका पार्टीत ही घटना घडली. या पार्टीत जवळपास 27 जणांना गोळ्या मारण्यात आल्या आहेत. या गोळीबाराचा आवाज कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेविषयी The Spectator Index या एक्स हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे.
बीएनओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार घटनेचे साक्षीदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ओहियोच्या एक्रोनमध्ये एका ब्लॉक पार्टीमध्ये गोळीबाराची घटना घडली. या घटनेत जवळपास 27 जणांना गोळ्या मारण्यात आल्या. यामध्ये एका व्यक्तीचा मृ्त्यू झाला आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती देण्याचं आवाहनं केलं आहे. पोलिसांनी अजून कुणाला अटक केलेली नाही.
गोळीबाराचा आवाज कॅमेऱ्यात कैद
ही घटना मध्यरात्री घडली आहे. क्लीवलँडपासून अक्रोनमध्ये 27 मैल दक्षिणेकडे केली आणि 8 व्या अवेन्यूजवळ एका वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबाराची घटना घडली. हा पार्टी जिथं सुरु होती तिथून काही अंतरावर असलेल्या घराजवळ सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात गोळ्यांचा आवाज रेकॉर्ड झाला होता.
पाहा व्हिडीओ :
🚨#BREAKING: A mass shooting incident has occurred reportedly at a birthday block party, with over 27 people shot with fatalities and multiple hospitals are on lockdown ⁰⁰📌#Akron | #Ohio ⁰⁰Currently, numerous law enforcement and emergency personnel agencies are on the scene… pic.twitter.com/7EvQxkK8g9
— R A W S A L E R T S (@rawsalerts) June 2, 2024
27 वर्षांच्या युवकाचा मृत्यू
अक्रोन पोलिसांनी 27 लोकांना गोळ्या लागल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेत एका 27 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही जखमींना खासगी वाहनांनी रुग्णालयात नेण्यात आलं. ज्यांना गोळ्या लागल्या आहेत त्यांच्या प्रकृतीची माहिती देखील अद्याप समोर आलेली नाही. डब्ल्यूईडब्ल्यूएस चॅनेलच्या फोटोग्राफरनं पोलीस चौकशीत घटनास्थळी 30 हून अधिक ठिकाणी गोळीबार झाल्याचे पुरावे मिळाल्याचं म्हटलं. घटनास्थळावरुन एक बंदूक देखील जप्त करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांकडन माहिती देण्याचं आवाहन
पोलिसांनी या पार्टीत गोळीबार का झाला याबद्दल माहिती दिली नाही. पोलिसांनी या गोळीबाराबद्दल कोणत्या नागरिकांना माहिती असल्यास ती देण्याचं आाहन केलं आहे. पोलिसांनी यासाठी नंबर देखील जारी केले आहेत.
संबंधित बातम्या :