(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hush Money Case: हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व 34 आरोपांत डोनाल्ड ट्रम्प दोषी; राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार?
Donald Trump Hush Money Case: अमेरिकेच्या इतिहासात विद्यमान किंवा माजी राष्ट्राध्यक्षांविरुद्ध फौजदारी खटला सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वच्या सर्व 34 प्रकरणांत दोषी ठरवण्यात आलं आहे.
Donald Trump Convicted In Hush Money: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना हश मनी (Hush Money) प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. या खटल्यावर सलग दोन दिवस सुनावणी पार पडली, त्यानंतर 12 सदस्यीय ज्युरींनी त्यांना या प्रकरणातील सर्वच्या सर्व 34 आरोपांवर दोषी ठरवलं. अमेरिकेच्या इतिहासात विद्यमान किंवा माजी राष्ट्राध्यक्षांविरुद्ध फौजदारी खटला सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रम्प यांच्यावर 2016 मध्ये राष्ट्रपती निवडणुकांपूर्वी पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्सला मौन बाळगण्यासाठी पैसे दिल्याचं लपवण्यासाठी आणि व्यावसायांती रेकॉर्ड्समध्ये फेरफार केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपांमध्ये डोनाल्ड ट्रम्प दोषी आढळले असून 11 जुलैला डोनाल्ड ट्रम्प यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
न्यायमूर्ती जुआन मार्चेन 11 जुलै रोजी त्याची शिक्षा जाहीर करतील. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन 15 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी पक्षाकडून पुढच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. त्याचदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टरुमच्या बाहेर बोलताना सांगितलं की, मी काहीच चुकीचं केलेलं नाही. मी निर्दोष आहे. मी लढणार. आपण शेवटपर्यंत लढायचं आणि जिंकायचं. खरा निर्णय पाच नोव्हेंबरला देशातील जनता करेल. सुरुवातीपासूनच हा वादात अडकलेला निर्णय होता. दरम्यान, याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना चार वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण, जेलमध्ये गेल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचार करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. मात्र, तुरुंगात गेल्यानंतरही तुरुंगात असताना राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यास त्यांना प्रचारापासून किंवा पदाची शपथ घेण्यापासून रोखलं जाणार नाही.
Former US President Donald Trump found guilty on all 34 felony charges in hush money trial
— ANI Digital (@ani_digital) May 30, 2024
Read @ANI Story | https://t.co/u8P0JN50HT#Trump #HushMoneyTrial #US pic.twitter.com/35zuy7pQvc
हश मनी प्रकरण नेमकं काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी 2006 मध्ये स्टॉर्मी डॅनियल्ससोबत शारीरिक संबंध ठेवले होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. स्टॉर्मी डोनाल्ड ट्रम्प यांना सातत्यानं ही बाब सार्वजनिक करण्याची धमकी देत होती, त्यानंतर ट्रम्प यांनी तिला गुपचूप पैसे दिले. डॅनियल्सला दिलेलं 130,000 डॉलर्सचं पेमेंट लपवण्यासाठी ट्रंप यांनी त्यांच्या व्यावसायिक रेकॉर्ड्समध्येही फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर असून याप्रकरणी त्यांना दोषीठरवण्यात आलं आहे. यापूर्वी स्टॉर्मी डॅनियलनं कोर्टात सांगितलं होतं की, जेव्हा तिनं ट्रम्प यांना पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा त्यांनी रेशमी पायजमा घातला होता. त्या घटनेचं वर्णन करताना स्टॉर्मी डॅनियल्सनं सांगितले होते की, ट्रम्प यांनी मला माझ्या एडल्ट इंडस्ट्रीमधील करिअरबद्दल विचारलं होतं. त्यांनी मला लैंगिक संक्रमित रोग (STD) साठी चाचणी केली आहे का? असंही विचारलं होतं, असं सांगितलं.