Social Media Trend : 'All Eyes on Rafah', कोणी केलं समर्थन तर कोणाकडून उमटले निषेधाचे सूर, सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळे सिनेसृष्टीत खळबळ ;नेमकं प्रकरण काय?
All Eyes on Rafah : सोशल मीडियावरील ऑल आईज ऑन रफाह या ट्रेंडमुळे सिनेसृष्टीतून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळतंय.
Social Media Trend : सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका पोस्टने चांगलीच खळबळ माजवली आहे. अगदी सामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत या पोस्टने वातावरण निर्मिती केली आहे. 'All Eyes on Rafah' (ऑल आईज ऑन रफाह) अशा नावाचं एक टेम्प्लेट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. ही पोस्ट बॉलीवूडच्याही (Bollywood) अनेक कलाकार मंडळींनी केलीये. पण या पोस्टमुळे बॉलीवूडसह मराठी कलाकारांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय.
पण सध्या मुद्दा असा आहे की, ऑल आईज ऑन रफाह हे नेमकं आहे तरी काय? तर याची सुरुवात सोशल मीडियावरुन होते आणि शेवटही सोशल मीडियावरच होतो. तर याचा संबंध हा इस्राईल आणि पॅलेस्टाईन यु्द्धाशी आहे. इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये मागील काही महिन्यांपासून संघर्ष फार चिघळत चाललाय. त्यातच गाझाच्या दक्षिण भागीतील रफा शहारावर इस्रायलने हल्ला केला. त्यानंतर सोशल मीडियावर एकच संतापाची लाट उसळ्याचं पाहायला मिळत आहे. अगदी माधुरी दिक्षितपासून साऱ्यांनी ही पोस्ट शेअर केली. इतकंच नव्हे तर यावर सोशल मीडियाव नेटकऱ्यांनी विरोध केलाच पण भारतातील इस्रायली दुतावासानेही यावर मत व्यक्त करत कलाकारांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
कलाकारांच्या भूमिकांवर आक्षेप
माधुरी दिक्षित, दिया मिर्झा, करीना कपूर खान, आलिया भट्ट, वरुण धवन, तृप्ती डिमरी, समांथा प्रभू, फातिमा सना शेख आणि स्वरा भास्कर यांसह अनेक कलाकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्याचसोबत मराठी सिनेसृष्टीत रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री मोटे, स्वानंद किरकिरे यांनी देखील या पोस्ट शेअर केल्या आहेत. पण काही कलाकारांनी या ट्रेंडचा जाहीर निषेधही व्यक्त केलाय.
अभिनेता सौरभ गौखले याने यावर आक्षेप घेतला असून त्याचसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने म्हटलं की, स्वत:च्या घरी कामाला येणाऱ्या बाईंचं पोर शाळेत जाऊ शकतं कि नाही हे आम्हाला माहित नाही, पण आमचं स्टेटस 'All Eyes on Rafah'. दरम्यान कलाकारांच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा बॉलीवूड बायकोट असाही ट्रेंड सुरु झालाय.
कलाकार का झाले ट्रोल?
कलाकारांची ही भूमिका एकतर्फी असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यातच इस्रायलच्या दुतावासाने केलेल्या पोस्टमध्येही कलाकार एकतर्फी भूमिका घेत असल्याचं म्हटलं गेलंय. त्यातच भारताशी याचा संबंध जोडत काश्मीरी पंडिताचा उल्लेख नेटकऱ्यांकडून करण्यात येतोय. काश्मीरमध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांविरोधात हिंसा उफळली होती, तेव्हा कलाकार मंडळी कुठे होती, असाही प्रश्न नेटकऱ्यांनी केलाय. त्याचप्रमाणे कलाकारांनी कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी त्याची कल्पना असावी असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
Bollywood will never talk about atrocities on Kashmiri Pandits ??
— raman raina (@ramanraina007) May 28, 2024
Pakistan and Bangladesh Hindus ??
But but but....they post on rafah,
All cutputli are posting this as toolkit🤣
Thats why Boycott Bollwood
*******#alleyesonrafah#DelhiRiots #PMModiOnABP #Atishi pic.twitter.com/Xb5lFfGeMD
इस्रायलने रफावर केलेल्या या हल्ल्यात जवळपास 45 पॅलिस्टिनी लोकांचा अंत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध सुरु झाल्यानंतर स्वत:च्या बचावासाठी पॅलिस्टॅनी लोकं रफामधील एका ठिकाणी स्थलांतरित झालीत. त्यांच्यावरच हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.