Russia Ukraine War : 'तोपर्यंत युक्रेनहून माघारी परतणे नाही', रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं वक्तव्य
Russia Ukraine Conflict : निश्चित लक्ष्य पूर्ण होईपर्यंत रशियन सैन्याचे युक्रेनवरील हल्ले सुरु राहतील, असं वक्तव्य राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केलं आहे.
Vladimir Putin On Ukraine War : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) संघर्ष सुरुच आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला सहा महिने उलटून गेले आहेत. एकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष या दोन्ही देशांतील संघर्ष संपण्याची वाट पाहत आहे. या दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांनी केलेलं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे. पुतिन यांच्या या वक्तव्यावर युद्धाची पुढील परिस्थिती अवलंबून आहे. पुतिन यांनी म्हटलं आहे की, 'जोपर्यंत निश्चित लक्ष्य पूर्ण होतं नाही तोपर्यंत रशियन सैन्याची युक्रेनमधील कारवाई सुरुच राहील.'
पुतिन यांनी युद्धाच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देत सांगितलं आहे की, 'जोपर्यंत आमचं लक्ष्य पूर्ण होतं नाही, तोपर्यंत रशियाचा युक्रेनवरील हल्ला सुरुच राहिल आहे.' युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिमेकडील देशांनी रशियावर अनेक निर्बंध लावले आहेत. पुतिन यांनी या मुद्द्यावरून पश्चिमेकडील देशांवर निशाणा साधला आहे.
पुतिन यांनी युक्रेनमध्ये सैन्य का पाठवले?
पुतिन म्हणाले की, युक्रेनमधील रशिया-समर्थित फुटीरतावादी भागांचे रक्षण करण्यासाठी युक्रेनमध्ये सैन्य पाठविण्यात आले होते.' फुटीरतावाद्यांनी 2014 मध्ये रशियाने क्राइमियाला जोडल्यानंतर संघर्षात युक्रेनियन सैन्यांशी लढा दिला. 'रशियाच्या प्रत्येक पाऊलाचा उद्देश डॉनबासमध्ये राहणाऱ्या लोकांना मदत करणे हा आहे. हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही हे ध्येय नक्कीच साध्य करू. पाश्चात्य देशांच्या निर्बंधांना तोंड देत रशियाने आपले सार्वभौमत्व मजबूत करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे' असंही पुतिन यांनी पुढे सांगितलं आहे.
रशियाची अर्थव्यवस्था
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढे म्हणाले की, 'मला पूर्ण विश्वास आहे की, या युद्धात आम्ही काहीही गमावलं नाही आणि काहीही गमावणार नाही. सर्वात सकारात्मक बाब म्हणजे रशियाचं सार्वभौमत्व अधिक मजबूत झालं आहे. रशियाची अर्थव्यवस्था आणि आर्थिक परिस्थिती स्थिर झाली आहे. महागाई कमी झाली आहे आणि बेरोजगारीचा दरही कमी झाला आहे. जागतिक पातळीवर वर्चस्व राखण्यासाठी आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी रशियाला अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांच्या खेळीचा सामोरं जावं लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या