Russia Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे रशियन सैनिकांच्या मातांना भावनिक आवाहन, म्हणाले...
Russia Ukraine Conflict : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी रशियन सैनिकांच्या मातांना आपल्या मुलांना युक्रेन विरूद्धच्या युद्धात न पाठवण्याचे आवाहन केले आहे.
Russia Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी शनिवारी रशियन सैनिकांच्या कुटुंबीयांना भावनिक आवाहन करणारा व्हिडीओ जारी केला आहे. झेलेन्स्की यांनी रशियन सैनिकांच्या मातांना आपल्या मुलांना युक्रेन विरूद्धच्या युद्धात न पाठवण्याचे आवाहन केले आहे. झेलेन्स्की म्हणाले, “मला पुन्हा एकदा रशियन मातांना, विशेषत: सैनिकांच्या मातांना सांगायचे आहे की, रशियन मातांनी त्यांच्या मुलांना युक्रेनमध्ये युद्धासाठी पाठवू नये. तुमचा मुलगा कुठे आहे? त्याची माहिती घ्या. तुमच्या मुलाला युक्रेन विरुद्ध युद्धासाठी पाठवले जाऊ शकते अशी शंका आल्यानंतर त्यांना युद्धासाठी पाठवू नका. जेणेकरून तुमचा मुलगा युद्धात मारला जाणार नाही, किंवा पकडला जाणार नाही."
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 16 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. युद्धादरम्यान दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय युक्रेनवर हल्ला केल्यामुळे जगभरातून रशियावर निर्बंध लादले जात आहेत. या नर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. असे असतानाही दोन्ही देशांकडून युद्ध माघार घेण्याबाबत कोणतीही पावले उचलली जात नाहीत. याच दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नुकतात एक व्हिडीओ शेअर करत रशियन सैनिकांच्या मातांना भावनिक आवाहन केले आहे.
“हे भयंकर युद्ध युक्रेनला कधीच नको होते. परंतु, आम्ही जास्तीत जास्त बचाव करू, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशियामधील अनेक महिलांनी आपल्या मुलांना युद्धासाठी युक्रेनमध्ये पाठवले जात असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. महिलांच्या या माहितीनंतर बुधवारी रशियाने कबूल केले आहे की, त्यांच्या अनेक सैनिकांना युक्रेनमध्ये कैद करण्यात आले आहे. या शिवाय युक्रेनने गेल्या आठवड्यात रशियन सैनिकांच्या मातांना आपल्या हद्दीत येऊन मुलांना परत घेऊन जाण्याचे आवाहन केले होते.
युक्रेनियन संरक्षण मंत्रालयाने फोन नंबर आणि एक ईमेल प्रसिद्ध केला आहे. ज्याद्वारे कैद करण्यात आलेल्या रशियन सैनिकांच्या नातेवाईकांना त्यांच्याबद्दल माहिती मिळू शकेल. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून रशियाच्या अनेक सैनिकांना ताब्यात घेतल्याचा युक्रेनने दावा केला आहे.
दरम्यान, गेल्या 16 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनच्या अनेक शहरांवर सातत्याने बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. युद्धामुळे आतापर्यंत युक्रेनमधील सुमारे 20 लाख लोकांनी इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे, तर शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 12 हजार पेक्षा जास्त रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल
- Russia Ukraine War : 1000 पेक्षा जास्त रशियन सैनिक मारले; युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा
- Russia Ukraine War: कीवचा पाडाव होणार? रशियाचे सैन्य युक्रेनच्या राजधानीच्या उंबरठ्यावर
- कॉमेडियन ते राष्ट्राध्यक्ष! आता हा पठ्ठ्या थेट पुतिन यांना भिडतोय अन् नडतोय... जाणून घ्या कसा आहे