Ukraine Drone Attack : 4 एअरबेस, 40 विमानं, यूक्रेनच्या 'ऑपरेशन स्पायडरवेब'मुळं रशियाला 200 कोटी डॉलरचं नुकसान, व्हिडिओ समोर
Viral Video of Drone Attack: यूक्रेननं रशियाच्या सायबेरियामध्ये ऑपरेशन स्पायडरवेबद्वारे 40 विमानांवर ड्रोन हल्ले केले. यामुळं रशियाचं 200 कोटी डॉलरचं नुकसान झालं आहे.

Ukraine Drone Attack in Russia: रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, रशिया आणि यूक्रेन यांच्यातील संघर्ष वाढत आहे. यूक्रेननं रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. यूक्रेननं रशियाच्या सायबेरियाच्या एका एअरबसेवर हल्ला केला. त्यामध्ये 40 हून अधिक रशियाच्या विमानांवर हल्ला केल्याचा दावा केला.रशियाच्या सैन्य तळांवरील विमानावरील ड्रोन हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत विमानतळावरील धावपट्टींवर उभ्या असलेल्या विमानांना आग लागल्याचे दिसून आले आहेत, धुरांचे लोट देखील पाहायला मिळतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ड्रोन देखील पाहायला मिळतो.
यूक्रेनकडून चार हवाई तळांवर हल्ले
यूक्रेनमधील प्रकाशन संस्था Pravada नुसार, यूक्रेननं Pavutyna नं ऑपरेशन स्पायडरवेब द्वारे रशियामध्ये स्पेशल ऑपरेशन सुरु केलं. यूक्रेननं हा हल्ला रशियाच्या दीर्घ टप्प्यातील हल्ल्याची क्षमता खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. यूक्रेननं रशियाच्या चार हवाई तळांवर असलेल्या 40 बॉम्बर एअरक्राफ्टसवर हल्ला केला. यूक्रेननं त्यांच्या सीमेपासून 4700 किमी अंतरावर असलेल्या रशियाच्या बेलाया एअरबेस, 2000 किमी अंतरावर असलेल्या ओलेन्या, 700 किमी दूर अंतरावर असलेल्या ड्यागिलेवो आणि 900 किलोमीटर अंतरावर ल्वानोवे एअरबेसवर ड्रोन हल्ला केला.
Ukrainian "Pavutyna" (spider net) operation is today's attack launched simultaneously on four russia's strategic aviation airbases has reportedly destroyed 40 (forty) strategic bombers on 4 (four) airbases: Belaya (4700 km from Ukraine), Dyagilevo (700 km), Olenya (2000 km),… pic.twitter.com/AYr5g7Xr7L
— Sergej Sumlenny, LL.M (@sumlenny) June 1, 2025
यूक्रेनचं ऑपरेशन स्पायडरवेब
यूक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्याला ऑपरेशन स्पायडरवेब हे नाव दिलं आहे. रशियाच्या टीयू -95, टीयू-22एम 3 बॉम्बर्स एअरक्राफ्टसह ए-50 हवाई अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्टचा समावेश आहे. यूक्रेननं रशियाच्या ज्या विमानावर ड्रोन हल्ले केले त्याची किमंत 200 कोटी डॉलर्स होते.

























