(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trending : आधी अॅसिड तोंडावर फेकलं... पश्चात्ताप झाल्यानंतर त्याच तरुणीसोबत लग्न
Turkey Acid Attack : तुर्कीमध्ये ब्रेक अपनंतर प्रियकराने प्रेयसीवर अॅसिड हल्ला केला, ज्यामुळे त्याला तुरुंगवासाची झाली. शिक्षा संपल्यानंतर प्रेयसीने हल्ला करणाऱ्या प्रियकरासोबतच लग्न केलं.
Turkey Acid Attack : जगभरात अॅसिड हल्ला (Acid Attack) हा निर्घृण अपराध असून या विरोधात अनेक देशांमध्ये याविरोधात कठोर कायदे करण्यात आले आहेत. अॅसिड हल्ल्याच्या अनेक ह्रदय पिळवटणाऱ्या घटना कानावर येतात. पण तुर्कीमध्ये मात्र अॅसिड हल्ल्याची एक वेगळी घटना समोर आली आहे. तुर्कीमधील बर्फिन ओजेक या तरुणीने अॅसिड हल्ला केलेल्या तरुणाशीच लग्न केले आहे. अॅसिड हल्ल्यानंतर 20 वर्षांची ही मुलगी जवळपास आंधळी झाली आहे. या तरुणीला आता केवळ 30 टक्केच दृष्टी आहे.
2019 मध्ये बर्फिनवर अॅसिड हल्ला
तुर्कीमधील कासिम ओझान सेल्टिक या 23 वर्षीय तरुणाने 2019 मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर बर्फिन ओजेक या तरुणीवर अॅसिड फेकले. त्यानंतर मुलगी जवळजवळ आंधळी झाली आणि आता ती फक्त 30% पाहू शकते. अॅसिड हल्ल्यापूर्वी कासिमने बर्फिनला सांगितले होते. 'ती त्याची होऊ शकत नाही, तर तिला इतर कोणाचीही होऊ देणार नाही'. शुद्धीवर आल्यानंतर बर्फिनने याबाबत सांगितले. त्यानंतर कासिमला 13 वर्षे 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, कायद्यात बदल झाल्यामुळे त्यांची तुरुंगातून लवकर सुटका झाली.
तुरुंगातून सुटल्यानंतर कासिमला आपली चूक समजली आणि त्याने अनेकवेळा बर्फिनची माफी मागितली. तिला अनेकदा मेसेजही केले. त्यामुळे बर्फिनचे हृदय पिघळले आणि तिने कासिमला माफ केले आणि तक्रार मागे घेतली. त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला दोघांनी लग्न केले.
तरुणीच्या वडिलांना लग्नाची माहिती नव्हती
लग्नाच्या प्रकरणाबाबत, बर्फिनचे वडील यासर ओझेक म्हणाले, ''मला याची माहिती नाही, आम्ही याप्रकरणी कायदेशीर लढा लढला पण सर्व निष्फळ झाले.'' या प्रकरणावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने म्हटले, ''माफी केल्याने गुन्हे कमी होत नाहीत.''
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : देशात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनचा धोका, निवडणूक आयोगाने आरोग्य सचिवांकडून मागवला अहवाल
- iPhone SE 3 : अॅपल आणणार आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 'आयफोन SE 3', 'हे' भन्नाट फिचर्स
- नागालँडमधील अफ्स्पा कायदा मागे घेण्यासाठी समिती गठीत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha