एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Turkey Earthquake Damages : तुर्किएमध्ये भूकंपामुळे किती नुकसान झाले? जागतिक बँकेने सांगितला 'एवढा' मोठा आकडा!

Turkey Earthquake Damages : 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामुळे तुर्किए देशाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती जागतिक बँकेने दिली आहे.

Turkey Earthquake Damages :  पश्चिम आशियाई देश तुर्किए (Turkey Earthquake) आणि सीरियामध्ये (Syria) सहा फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपाने मोठी हानी झाली आहे. या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये 50 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 80 हजारांहून अधिक लोक जखमी झाले. हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दोन्ही देशांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. तुर्किए देश जवळपास उद्धवस्त झाल्याचे चित्र आहे. देशाला सावरण्याचे मोठं आव्हान तुर्किए सरकार समोर आहे. या भूकंपात नेमंक किती नुकसान झालं, याची माहिती जागतिक बँकेने दिली आहे. 

जागतिक बँकेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या विनाशकारी भूकंपाने तुर्किएचे जवळपास 34 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. रुपयांमध्ये ही रक्कम सुमारे दोन लाख 81 हजार कोटी इतकी होते. जागतिक बँकेने एका अहवालात ही बाब नमूद केली आहे.

6 फेब्रुवारी रोजी तुर्किएमध्ये झालेल्या दोन मोठ्या भूकंपांमुळे सुमारे 34.2 अब्ज डॉलरचे प्रत्यक्ष भौतिक नुकसान झाले. परंतु, भूकंपानंतर एकूण पुनर्बांधणी करण्याचा खर्च दुप्पट असू शकतो, असेही जागतिक बँकेने सोमवारी सांगितले.

या भूकंपाचा फटका तुर्किएच्या विकासालाही बसणार असल्याचा अंदाज जागितक बँकेने वर्तवला आहे. या भूकंपाच्या परिणामी तुर्किएच्या जीडीपीत किमान अर्धा टक्क्यांची घट होणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. जागतिक बँकेने हा वर्तवलेला अंदाज फक्त तुर्किएसाठी आहे. सीरियातमध्ये नेमकं किती नुकसान झालं याचा अंदाज स्वतंत्रपणे वर्तवण्यात येणार असल्याची माहिती  जागतिक बँकेचे युरोप आणि मध्य आशिया विभागाचे उपाध्यक्ष अॅना ब्जेर्डे यांनी दिली. 

दरम्यान, वृत्तांनुसार, तुर्किए सरकारकडून दोन लाख घरे बांधण्यात येणार असून ग्रामीण भागातील 70 हजार घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी 15 अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित आहे. भूकंपामुळे जवळपास 1.5 दशलक्ष नागरीक बेघर झाली आहेत. त्यांच्यासाठी पाच लाख घरांची आवश्यकता आहे. अनेक प्रकल्प, बांधकामांशी निगडित प्रकल्पांची निविदा काढण्यात आली आहे. या सगळ्या प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात येणार आहे.  सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे माहिती तुर्किए सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.

भारतासह इतर 84 देशांच्या पथकांकडून बचावकार्य सुरू 

6 फेब्रुवारी रोजी तुर्कीए आणि सीरियामध्ये मोठा भूकंप आला. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. भूकंपानंतर सुमारे 100 हून अधिक आफ्टर शॉक बसले. भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी भारताने NDRF पथकाला तुर्कीमध्ये पाठवलं. भारतासह इतर 84 देशांच्या बचाव पथकांकडून तुर्की आणि सीरियामध्ये बचावकार्य सुरू आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
मोठी बातमी : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
Premachi Goshta Serial Update : सागरसाठी मिहिर करणार मोठा त्याग, सावनीला तिच्या कृत्यावर मुक्ता सुनावणार;  'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
सागरसाठी मिहिर करणार मोठा त्याग, सावनीला तिच्या कृत्यावर मुक्ता सुनावणार; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
Sanjay Raut: दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Chembur Blast : मुंबईत चेंबूरमध्ये एका घरात गॅस सिलेंडर स्फोट, आठ जण जखमीVanchit Result 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्तSanjay Raut Full Pc :  मोदींनी सत्ता स्थापन करून पंतप्रधानपद घेतलं तरी त्यांचं सरकार टिकणार नाहीTOP 90 : सकाळच्या 9  च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 06 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
मोठी बातमी : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
Premachi Goshta Serial Update : सागरसाठी मिहिर करणार मोठा त्याग, सावनीला तिच्या कृत्यावर मुक्ता सुनावणार;  'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
सागरसाठी मिहिर करणार मोठा त्याग, सावनीला तिच्या कृत्यावर मुक्ता सुनावणार; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
Sanjay Raut: दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
Embed widget