एक्स्प्लोर
ट्रम्प यांच्या निर्णयाला गूगल, फेसबुकसह 97 कंपन्यांचं कोर्टात आव्हान
सॅन फ्रान्सिस्को: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, त्यांचा पहिलाच निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला. ट्रम्प यांच्या 7 मुस्लीमबहुल देशातील नागरिकांना अमेरिका बंदी केल्याने, आता या निर्णयाविरोधात बड्या कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये महिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गूगलसह सिलिकॉन व्हॅली अशा एकूण 97 कंपन्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली.
'अमेरिकेत प्रवेश करण्याच्या निर्णयात अचानक बदल केल्याने, अमेरिकन कंपन्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं,' या याचिकेत म्हणलं आहे. या याचिकेचं ट्विटर, नेटफ्लिक्स आणि ऊबरसारख्या कंपन्यांनीही समर्थन केलं आहे. सीएनएनमनीने दिलेल्या वृत्तानुसार ही याचिका रविवारी नाईंथ सर्किट कोर्ट ऑफ अपिल्समध्ये दाखल करण्यात आली.
दरम्यान, न्यायालयानेही अमेरिकन सरकारच्या निर्णयावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे. या प्रस्तावाचे फेसबुक, ईबे आणि इंटेलसोबतच लेवी स्ट्रॉस आणि चोबानी सारख्या अवैध कंपन्यांनी समर्थन केलं आहे.
तर दुसरीकडे न्यायालयाच्या या निर्णयानंतर ट्रम्प यांनी ट्वीट करुन, 'प्रवेशबंदी करुन न्यायालय अमेरिकेच्या सीमांना धक्का लावत आहे. न्यायालयाने असे निर्णय देऊन देशाला संकटात टाकलं आहे. त्यामुळे भविष्यात देशावर कोणतेही संकट चालून आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी न्यायमूर्ती आणि कोर्टाची असेल,' असं म्हणलं आहे. संबंधित बातम्या ट्रम्प यांच्या मुस्लिमांना देशबंदीच्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती मुस्लीमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एंट्री : ट्रम्प ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणावर फेसबुक, गुगल, अॅपलचं टीकास्त्र डोनाल्ड ट्रम्प आता पाकिस्तानवरही बंदी घालणार? इराणचं अमेरिकेला जशास तसं उत्तर, अमेरिकन नागरिकांना इराणमध्ये ‘नो एंट्री’Just cannot believe a judge would put our country in such peril. If something happens blame him and court system. People pouring in. Bad!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 5, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement