(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tipu Sultan Painting : टिपू सुलतान यांच्या पेंटिंगचा लिलाव; मिळाले कोट्यवधी रुपये, काय आहे खासियत...
हैदर अली (Hyder Ali) आणि त्यांचा मुलगा टिपू सुलतान (Tipu Sultan) यांच्या ईस्ट इंडिया कंपनीवरील ऐतिहासिक विजयाचे चित्रण करणाऱ्या पेंटिंगचा लिलीव झाला आहे.
Tipu Sultan Painting : म्हैसूरचे शासक हैदर अली (Hyder Ali) आणि त्यांचा मुलगा टिपू सुलतान (Tipu Sultan) यांच्या 1780 मधील ईस्ट इंडिया कंपनीवरील ऐतिहासिक विजयाचे चित्रण करणाऱ्या पेंटिंगचा बुधवारी (31 मार्च) लंडनमध्ये लिलाव करण्यात आला. 6,30,000 पौंड म्हणजेच सहा कोटी 28 लाख रूपयांना या पेटिंगचा लिलाव करण्यात आला.
10 सप्टेंबर 1780 रोजी दुस-या अँग्लो-म्हैसूर युद्धाचे 'बॅटल ऑफ पोलीलूर' हे पेंटिंग सोदबी या लीलाव करण्याऱ्या कंपनीच्या लिलावातील मुख्य आकर्षण ठरले. पोलीलूरच्या युद्धाचा आणि विजयाचा दस्तऐवज असावा यासाठी टिपू सुलतानने हे चित्र 1784 मध्ये सेरिंगपट्टनमच्या दर्या दौलत बागेत भृत्तिचित्रच्या रूपात बनवण्याचा आदेश दिला होता.
सोदबीनं याबाबतील ट्वीट देखील शेअर केलं आहे
#AuctionUpdate Leading the charge in today's Arts of the Islamic World & India auction so far, this monumental 32-foot / 9-metre Pollilur battlescene - depicting Tipu Sultan's victory - sells for £630,000.#SothebysIndian #SothebysMiddleEast pic.twitter.com/oSq6VYMCEo
— Sotheby's (@Sothebys) March 30, 2022
तज्ज्ञांनी सांगितल्या पेंटिंगबाबत खास गोष्टी
सोदबीचे तज्ज्ञ विल्यम डॅलरीम्पल म्हणाले, 'या पेंटिंगमध्ये लढाईतील हिंसाचार आणि दहशतीचे चित्रण उत्तम प्रकारे करण्यात आले आहे. ही पेंटिंग वसाहतवादाच्या पराभवाचा सर्वात मोठा नमुना आहे. कलाकृती म्हणून ही पेंटिंग अतुलनीय आहे.'
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- शेतीसाठी उपकरणे खरेदी करताय? सरकारी अनुदानाचा मिळेल लाभ, जाणून घ्या सर्व माहिती
- जीएसटीच्या चौकशीत अडकल्या 'या' दिग्गज फार्मा कंपन्या, कर न भरणाऱ्यांवर कारवाई
- बँकिंग घोटाळ्यांमुळं सात वर्षात दररोज 100 कोटींचं नुकसान, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, RBI ची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha