जीएसटीच्या चौकशीत अडकल्या 'या' दिग्गज फार्मा कंपन्या, कर न भरणाऱ्यांवर कारवाई
GST: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) न भरणाऱ्या देशातील बड्या फार्मा कंपन्यांवर डीजीजीआयने कारवाई केली आहे.
GST: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) न भरणाऱ्या देशातील बड्या फार्मा कंपन्यांवर डीजीजीआयने कारवाई केली आहे. त्यानुसार या फार्मा कंपन्यांनी जीएसटीच्या एका कलमाच्या नियमांचे उल्लंघन करून कर भरला नाही, त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. झी बिझनेस या वृत्त समूहाने ही बातमी दिली आहे
जीएसटीच्या तपास शाखेने डीजीजीआयने फार्मा क्षेत्रातील कंपन्यांमधील कर आकारणीबाबत सर्वेक्षण केले, ज्यामध्ये जीएसटी लागू झाल्यापासून या कंपन्यांनी कर भरला नसल्याचे समोर आले. कलम 25 चा चुकीचा अर्थ लावत फार्मा कंपन्यांनी हा कर भरला नाही.
कोणत्या कंपन्यांचा किती कर थकीत?
कंपन्याकडून चूक मान्य
डीजीजीआय सर्वेक्षणात ही बाब समोर आल्यानंतर या फार्मा कंपन्यांनी आपली चूक मान्य करून थकीत असलेली जीएसटीची रक्कम भरली आहे. मात्र, जीएसटी विभाग केवळ कलम 25 तपासत नाही. तर विभाग इतर अनेक गोष्टींवरही लक्ष ठेवून आहे, जसे की काही कंपन्यांनी त्यांची औषधे परदेशात पाठवली, जी US FDA ने नाकारली. परंतु कंपन्यांनी देशात त्यावर आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) घेतली, जी परत केली गेली नाही.
कलम 25 म्हणजे काय
जीएसटीच्या कलम 25 नुसार, जर एखाद्या कंपनीने आपल्या मुख्य कार्यालयातून शाखा कार्यालयात कोणतेही पेमेंट केले तर, 20 लाखांपेक्षा जास्त हस्तांतरणावर जीएसटी भरावा लागेल. मात्र या कंपन्यांनी 20 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर कर भरला नाही.
भविष्यातही कंपन्या जीएसटीच्या रडारवर
डीजीजीआयच्या या कारवाईनंतर या फार्मा कंपन्या आणखी पुढे जीएसटीच्या रडारवर येणार आहेत. जीएसटी आता केवळ त्यांचे कलम 25 नाही तर इतर व्यवहारही पाहणार आहे. मात्र, या कंपन्यांनी तातडीने आपली चूक मान्य करून कर भरला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :