एक्स्प्लोर
2018मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता, वैज्ञानिकांचा इशारा
पृथ्वीच्या परिवलनाची गती मंदावल्यानं 2018 मध्ये पृथ्वीवर मोठे भूकंप होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
मुंबई : आजवर अनेक भविष्यवेत्त्यांनी पृथ्वीच्या सर्वनाशाची भाकितं वर्तवली आणि ती फोलही ठरली. पण आता शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर एक संकट येण्याची शक्यता आहे.
पृथ्वीच्या परिवलनाची गती मंदावल्यानं 2018 मध्ये पृथ्वीवर मोठे भूकंप होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. तुम्हाला भीती घालण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. पण अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार असं होऊ शकतं.
साधारणपणे दर 25 ते 30 वर्षांनी पृथ्वीची गती मंदावण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे गती मंदावताच दर 32 वर्षांनी मोठे भूकंप होत असतात. गेल्या 4 वर्षांपासून पृथ्वीची गती सलग मंदावत आहे. त्यामुळे 2018 हे वर्ष पृथ्वीची गती मंदावण्याचे पाचवे वर्ष असेल आणि त्यामुळेच पुढच्या वर्षी 7 रिश्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेचे अनेक भूकंप होऊ शकतात.
भूकंप होतात तरी कसे हेही जाणून घेऊया :
- पृथ्वीच्या गाभ्याच्या आणि कवचाच्या मध्ये असलेले मेटल द्रवरुप असते. अर्धवट द्रवरुप असल्याने ते पृथ्वीच्या बाह्य कवचाला चिकटते. त्यामुळे पृथ्वीचे मॅग्नेटिक फील्ड बदलते. त्याचा थेट परिणाम पृथ्वीच्या परिवलनावर होतो आणि पृथ्वीची गती काही मिलिसेकंदांनी कमी होते. दिवसाच्या आकारातही बदल होतो. यामुळे चुंबकीय तरंग निर्माण होऊन भूकंप होतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement