Thailand Combodia Border Clash: मंदिरावरुन वाद पेटला, थायलंडचा कंबोडियावर एअर स्ट्राईक, भारताच्या शेजारी भयंकर युद्ध!
थायलंडच्या लष्कराने कंबोडियाच्या दोन्ही लष्करी तळांवर हवाई हल्ले केल्याची माहिती देण्यात आली आहे .दोन्ही बाजूंनी तणाव वाढत असून परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे .

Thailand Cambodia border clash: इस्रायल - इराण, भारत -पाकिस्तान देशांमध्ये भडकलेला संघर्ष थांबतो ना थांबतो तोच आता आशियातील आणखी दोन देशांमध्ये संघर्ष निर्माण झालाय. थायलंड आणि कंबोडिया यांच्या सीमारेषेवर सध्या जोरदार लढाया सुरू झाल्या असून दोन्ही देशांमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. थायलंडने कंबोडियन लष्करी तळांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत.यापूर्वी गुरुवारी सकाळी दोन्ही देशांच्या सैनिकांनी सीमेजवळ एकमेकांवर गोळीबार केला होता. कंबोडियन पंतप्रधान हुन मानेट म्हणाले की, ओड्डार मीन्चे, प्रीह विहार आणि उबोन रत्चाथानी प्रांतातील मंदिरांजवळ थाई सैन्याने केलेल्या कारवाईला प्रतिसाद म्हणून हा गोळीबार करण्यात आला.
थायलंड सैन्याने सांगितले गुरुवारी झालेल्या गोळीबारात 11 ही नागरिकांचा मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. दुसरीकडे कंबोडियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने थाई सैनिकांनी प्रथम गोळीबार केला असं म्हटलं आहे .तर कंबोडियाने सैन्य पाठवण्यापूर्वी अधिक ड्रोन तैनात केला होता .त्यानंतर त्यांनी तोफ आणि लांब पल्ल्याच्या BM21 रॉकेटने गोळीबार सुरू केल्याचं थायलंड सैन्यानं सांगितलं .
थायलंडने कंबोडियाशी जोडलेली सीमा बंद केली
CNN च्या वृत्तानुसार, रॉयल कंबोडियन आर्मीने थायलंडच्या सीमेलगतच्या गावांवर रॉकेट लॉन्चर्सच्या सहाय्याने जोरदार गोळीबार केलाय. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर थायलंडने आपली कंबोडिया अशी असलेली सीमा तातडीने बंद केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी एकमेकांवर संघर्ष सुरू केल्याचा आरोप करत दोषारोप सुरू केले आहेत.
भारताचा शेजारील देश असणाऱ्या म्यानमारच्या पलीकडे थायलंड आणि कंबोडिया हे देश आहेत . कंबोडियन पंतप्रधान हून मानेट यांनी सांगितलं की, प्रीह विहार आणि उबोन रत्च्याथानी प्रांतातील मंदिराजवळ स्थायी सैन्याने केलेल्या कारवाईला प्रतिसाद म्हणून हा गोळीबार करण्यात आला आहे .गोळीबार आणि तोफ खाण्याच्या गोळीबारात एक नागरिक ठार झाला तसेच सात सैनिक जखमी झाले आहेत .कंबोडियाच्या या कारवाईला उत्तर देताना थायलंडच्या लष्कराने कंबोडियाच्या दोन्ही लष्करी तळांवर हवाई हल्ले केल्याची माहिती देण्यात आली आहे .दोन्ही बाजूंनी तणाव वाढत असून परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे .
पुरातन वाद पुन्हा पेटला
थायलंड आणि कंबोडियामध्ये सीमेवरील वाद गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. विशेषतः प्रेह विहेअर मंदिराच्या मालकीवरून दोन्ही देशांमध्ये तीव्र मतभेद आहेत. याआधीही 2008 आणि 2011 मध्ये अशाच प्रकारचे रक्तरंजित संघर्ष घडले होते. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांतील तणाव सतत वाढत असून, आता तो पूर्ण लष्करी संघर्षात रूपांतरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी कोणताही तोडगा निघण्याची चिन्हं दिसत नाहीत.
थायलंड लष्करानुसार, सहा एफ-16 फायटर जेट्सनी गुरुवारी कंबोडियामध्ये प्रवेश केला. त्यापैकी एका जेटने कंबोडियातील एक लष्करी ठिकाण उद्ध्वस्त केल्याचा दावा थायलंडच्या लष्कर उपप्रवक्त्या ऋचा सुक्सुवानोन यांनी केला. वादग्रस्त सीमारेषेवर सहा ठिकाणी संघर्ष झाल्याचंही लष्करानं जाहीर केलं. थायलंडच्या लष्कराने स्पष्ट केलं की, सर्व फायटर जेट्स सुरक्षितपणे तळावर परतले आहेत. दरम्यान, कंबोडियन सैनिकांनी सुरिन प्रांतातील थाई लष्करी तळावर गोळीबार केल्याचा आणि सिसाकेत भागावर रॉकेटहल्ले केल्याचा आरोप थायलंडने केला आहे.
कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने थायलंडच्या हवाई हल्ल्यांची कबुली देत त्याचा तीव्र निषेध केला आहे. “थायलंडने आमच्यावर क्रूर आणि हिंसक लष्करी आक्रमण केलं आहे. आम्ही याला ठाम प्रत्युत्तर देऊ,” असं कंबोडियाने जाहीर केलं आहे. थायलंडच्या एफ-16 विमानांनी "वाट काव सिखा किरी स्वारक पॅगोडा"कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन बॉम्ब टाकल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या भागावर कंबोडियाचा हक्क असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.























