एक्स्प्लोर
अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या गोळीबारात 5 पोलिसांचा मृत्यू
टेक्सास : अमेरिकेच्या टेक्सासमधील डलास शहरात पोलिसांविरोधात कृष्णवर्णीयांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनादरम्यान दोन कृष्णवर्णीयांनी पोलिसांवरच गोळीबार केला. यात पाच पोलिसांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी आहेत.
मागील आठवड्यात पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये एल्टन स्टर्लिंग आणि फिलांडो केस्टाईल या दोन कृष्णवर्णीयांना ठार केल्याचा आरोप आहे. त्याच्या निषेधार्थ कृष्णवर्णीयांचं पोलिसांविरोधातच आंदोलन सुरु होतं. त्यावेळी पोलिसांवर हल्ला करण्यात आला.
दोन हल्लेखोरांनीपैकी एक पोलिसांना शरण आला आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या हल्लोखोराकडून बॉम्बसदृश स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.
गोळीबारानंतर डलास पोलिसांनी एका व्यक्तीचा फोटो ट्विटवर पोस्ट केला आहे. हा फोटो पोलिसांवर हल्ला करणाऱ्या संशयिताचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्यक्तीला शोधण्यासाठी पोलिसांची मदत करण्याचं आवाहनही केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement