एक्स्प्लोर

अमेरिका पुन्हा हादरली; चर्चमध्ये गोळीबार, 26 मृत्यूमुखी

सदरलॅण्ड स्प्रिंग्जच्या विल्सन कौंटी परिसरातील फर्स्ट बाप्टिस्ट चर्चवर हल्ला झाला. स्थानिक वेळेनुसार हल्लेखोर सकाळी 11.30 वाजता चर्चमध्ये घुसला आणि त्याने गोळीबार सुरु केला.

टेक्सास : अमेरिका पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरली. टेक्सासमधील एका चर्चवर रविवारी हल्ला झाला. चर्चमध्ये प्रार्थना सुरु असताना, बंदुकधारी हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. यात 26 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सदरलॅण्ड स्प्रिंग्जच्या विल्सन कौंटी परिसरातील फर्स्ट बाप्टिस्ट चर्चवर हल्ला झाला. स्थानिक वेळेनुसार हल्लेखोर सकाळी 11.30 वाजता चर्चमध्ये घुसला आणि त्याने गोळीबार सुरु केला. एकाच आठवड्यातील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. हल्ल्यात मोठी जीवितहानी झाली असून हल्लेखोरालाही कंठस्नान घातल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर चर्चबाहेर सुराक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेत दहशतवादी हल्ला, ट्रकने चिरडल्याने 8 जणांचा मृत्यू जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. एफबीआयचे एजंट घटनास्थळी दाखल पोहोचले आहेत. दरम्यान टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी हल्लाचा निषेध करत मृत आणि जखमींच्या दु:खात सहभागी असल्याचं सांगितलं. "टेक्सासच्या इतिहासातील हा सर्वात भयावह गोळीबार आहे," असंही ते म्हणाले. हल्ल्यातील मृतांमध्ये पाच ते 72 वर्षांपर्यंत नागरिकांचा समावेश आहे. सुमारे 20 जण जखमी झाल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. संशयित हल्लेखोर एक श्वेत तरुण असून त्याचं वय 20 ते 30 वर्षांदरम्यान आहे. हल्लेखोर काळ्या कपड्यांमध्ये होता, अशी माहितीही प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. आता बस झालं, आयसिसला अमेरिकेत घुसू देणार नाही : ट्रम्प दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जपानच्या दौऱ्यावर आहेत. हल्ल्यानतंर नंतर ट्वीट करुन परिस्थितीवर नजर असल्याचं त्यांनी सांगितलं. "देव सदरलॅण्ड स्प्रिंग्ज, टेक्सासच्या नागरिकांसोबत राहू दे. एफबीआय आणि पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत. मी जपानमधून घटनेवर नजर ठेवून आहे," असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget