टेस्ला कार ग्राहक बसले उपोषणाला, कारमधील या दोषांमुळे खरेदीदार नाराज
Tesla Owners Go On Hunger Strike: जेव्हा कार खराब होते तेव्हा खूप निराशा होते. कार खराब झाल्याचं हे दु:ख आणखीनच वाढतं जेव्हा गाडी नवीन असते. कारचे ग्राहक कार खराब झाल्यावर कंपनीकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी अनेक पद्धती वापरतात जेणेकरून त्यांचा आवाज कंपनीपर्यंत पोहोचेल.
Tesla Owners Go On Hunger Strike: जेव्हा कार खराब होते तेव्हा खूप निराशा होते. कार खराब झाल्याचं हे दु:ख आणखीनच वाढतं जेव्हा गाडी नवीन असते. कारचे ग्राहक कार खराब झाल्यावर कंपनीकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी अनेक पद्धती वापरतात जेणेकरून त्यांचा आवाज कंपनीपर्यंत पोहोचेल. अलीकडेच नॉर्वेमधील काही टेस्ला कार ग्राहकांनी आपली नाराजी दर्शवण्यासाठी असाच एक मार्ग स्वीकारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला कारच्या संतप्त ग्राहकांनी कंपनीकडून त्यांच्या मागण्यांसाठी 24 तासांचे सामूहिक उपोषण केले. टेस्ला कार मालकांनी सांगितले की, असे करून ते टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्राहकांच्या या गटाने त्यांच्या टेस्ला कारमध्ये येणाऱ्या समस्या सांगितल्या आहेत.
ग्राहकांनी सांगितले की, त्यांच्या कारमध्ये अनेक प्रकारचे बिघाड येत आहेत. बहुतेक समस्या कारची गुणवत्ता, बॅटरी आणि रेंज संबंधित होत्या. ग्राहकांनी सांगितले की, त्यांची नवीन टेस्ला कारची सीट काही दिवसांच्या वापरानंतर त्यावर बबल उठले आहेत. याशिवाय कारच्या इन्फोटेनमेंट स्क्रीनवरही काही गोष्टी दिसत नाहीत.
काही ग्राहकांनी असेही सांगितले की, पाऊस पडला की गाडीची डिक्की पाण्याने भरते आणि हे पाणी हळूहळू गाडीच्या आत जाते. तर काही ग्राहकांनी टेस्ला कारच्या रेंजवरही प्रश्न उपस्थित केले आणि सांगितले की, कारची रेंज कंपनीच्या दाव्यापेक्षा कमी आहे. ग्राहकांनी असेही सांगितले की टेस्लाने विनामूल्य चार्जिंग सुविधा देण्याचा दावा केला होता, परंतु कंपनीचे चार्जिंग स्टेशन त्यांच्याकडून पैसे घेत आहेत. काही लोकांनी टेस्ला कारमध्ये येणाऱ्या चार्जिंगच्या समस्येवर देखील प्रश्न उपस्थित केले आहे. उपशोषण करून ते इलॉन मस्क यांच्यापर्यंत त्यांची तक्रार पोहोचवू शकतील आणि या समस्यांपासून त्यांची लवकरच सुटका होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या ग्राहकांनी 27 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान 24 तास उपोषण केले.
टेस्लाबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या भारतात येण्याचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. टेस्लाला भारतात प्लांट न उभारता चीनमधून बनवलेल्या कार आयात करायच्या आहेत. यामुळे टेस्लाला फायदा होईल पण भारतात रोजगाराच्या संधी निर्माण होणार नाहीत. भारत सरकारचे म्हणणे आहे की, जर टेस्ला भारतात प्लांट उभारण्यास तयार असेल तरच त्याला भारताच्या मोठ्या बाजारपेठेत प्रवेश करण्यास परवानगी दिली जाईल. एका रिपोर्टनुसार, चीनमधील शांघाय येथे गीगाफॅक्टरी सुरू केल्यानंतर टेस्ला आता इंडोनेशियामध्ये आपली दुसरी गिगाफॅक्टरी सुरू करण्याचा विचार करत आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये टेस्लाने 200 मिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह शांघायमधील कारखान्याचा विस्तार करण्याची घोषणा केली होती.