एक्स्प्लोर
Advertisement
प्रसिद्ध टेनिसस्टार बोरिस बेकर दिवाळखोर घोषित
लंडन : टेनिस चॅम्पियन बोरिस बेकरला कोर्टाने दिवाळखोर घोषित केलं आहे. लंडनमधील कोर्ट रजिस्ट्रारने बेकरवर दिवाळखोरीची कारवाई करण्याचे आदेश दिले. बोरिस बेकर तीन वेळा विम्बल्डन विजेता ठरला आहे.
बोरिस बेकरला कर्जाची परतफेड करण्याची शेवटची संधी द्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी कोर्टाकडे केली. मात्र बेकर ही रक्कम इतक्यात परत करु शकण्याची कुठलीच खात्री नसल्याने, पुढील 28 दिवसांसाठी कोर्टाचं कामकाज स्थगित करण्यात रजिस्ट्रार ख्रिस्तिन डेरेट यांनी नकार दिला आणि बेकरला दिवाळखोर घोषित केलं.
अॅर्बटनॉट लॅथम अँड कंपनी या खाजगी बँकरनी बेकरविरोधात दिवाळखोरीबाबतचा अर्ज दाखल केला होता. बोरिसच्या वकिलांनी तो माजोर्कामधील स्थावर मालमत्ता विकून 60 लाख युरो म्हणजे अंदाजे 7.19 कोटी रुपयांचं कर्ज फेडेल, अशी हमी दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement