एक्स्प्लोर
अमेरिकेत भारतीयाची हत्या, आईच्या वाढदिवसाला येण्यापूर्वी काळाचा घाला
पुढच्या महिन्यात तो आईच्या वाढदिवसानिमित्त भारतात येणार होता. त्याआधीच त्याची अमेरिकेत एका अल्पवयीन मुलाने हत्या केली.
न्यू जर्सी: जुलै महिन्यात एका भारतीय नागरिक असलेल्या 26 वर्षीय तरुणाची अमेरिकेत हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी अमेरिकेच्या न्यू जर्सीमधील वेंटनोर शहरात सुनील एडला (61) या भारतीय नागरिकाची एका 16 वर्षीय मुलाने गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे वेंटनोरमधील भारतीय नागरिक घाबरले आहेत.
सुनील एडला दोन आठवड्यांनी त्यांच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतात येणार होते. एडला मूळचे भारतातील तेलंगणामधील मेडक येथील रहिवासी होते. मागील 30 वर्षांपासून ते वेंटनोर शहरात राहत होते. अॅटलांटिक सिटीमध्ये ते एका कंपनीत ऑडिटर म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी त्यांची नाईट शिफ्ट होती. त्यासाठी सायंकाळी ते घरुन निघाले होते. तेव्हा एका अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. स्थानिक पोलिसांनी गोळ्या झाडणाऱ्या मुलाला अटक केली आहे.
61-year-old Sunil Edla, from Telangana's Medak, was shot dead by a 16-year-old boy in New Jersey's Ventnor city on November 15 . The culprit has been arrested by Police. #USA pic.twitter.com/95UXwgSfws
— ANI (@ANI) November 18, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement