दक्षिण कोरियाची राजधानी सेयूलमध्ये चेंगराचेंगरी, 149 जणांचा मृत्यू
दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेयूलमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यामध्ये जवळपास 149 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
South Korea : दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेयूलमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यामध्ये जवळपास 149 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हॅलोवीन फेस्टीवलच्या कार्यकमात ही घटना घडली आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गर्दीतल्या 50 जणांना हृदयविकाराचा झटका आला आहे. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रपती यूं सुक-येओल यांनी योंगसान-गु जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद पथकाला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दक्षिण कोरियातील सेयूलमध्ये चेंगराचेंगरीची धक्कादायक घटना घडली आहे. हॅलोविन पार्टीदरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली. करोनाच्या संकटानंतर मोठ्या प्रमाणावर खुल्या पद्धतीनं नो मास्क हॅलोवीन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हॅलोवीन फेस्टिवल ज्या ठिकाणी आयोजित केला जाणार होता तिथं एक लाख लोक जमल्याची प्राथमिक माहिती आहे.
#SouthKorea | Morning visuals from the spot of the deadly stampede in Seoul that broke out during Halloween festivities yesterday leaving 149 dead and injuring scores of people till now
— ANI (@ANI) October 30, 2022
(Source: Reuters) pic.twitter.com/9REYUhFJKl
दरम्यान, सोशल मीडियावर हॅलोवीन फेस्टिवलच्या गर्दीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओतून काही लोक मोठी गर्दी जमल्यामुळ चक्कर येऊन पडत असल्याचं दिसत आहे. आरोग्य यंत्रणेकडून आपत्कालीन सेवांद्वारे रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या रस्त्यावर मोठ्या संख्येनं लोक हॅलोवीन फेस्टिवल साजरा करण्यासाठी जमले होते.