एक्स्प्लोर
पोटच्या पाच लेकरांची हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा पित्याला मृत्युदंड
आठ वर्षीय मेरा, सात वर्षीय इलियास, सहा वर्षीय नाथन, दोन वर्षीय गॅब्रिअल आणि एक वर्षीय अबिगेल यांची 37 वर्षीय जोन्सने हत्या केली होती
मुंबई : स्वतःच्या पाच मुलांचे प्राण घेणाऱ्या क्रूरकर्मा पित्याला अमेरिकेतील कोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. 2014 साली पोटच्या पाच चिमुकल्यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहांसह आरोपी अमेरिकेतील विविध शहरांमध्ये फिरला होता. दक्षिण कॅरोलिनामध्ये घडलेल्या हत्याकांडानंतर अलाबामामध्ये त्याने मृतदेहांची विल्हेवाट लावली होती.
आठ वर्षीय मेरा, सात वर्षीय इलियास, सहा वर्षीय नाथन, दोन वर्षीय गॅब्रिअल आणि एक वर्षीय अबिगेल यांची 37 वर्षीय जोन्सने हत्या केली होती. जोन्सला मृत्युदंड द्यावा, की पॅरोलची तरतूद नसलेली जन्मठेप ठोठवावी, याबाबत न्यायाधीशांमध्ये चर्चा झाली, अखेर एकमताने मृत्युदंडावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या जोन्सचा घटस्फोट झाला होता. विलक्षण गोष्ट म्हणजे जोन्सची घटस्फोटित पत्नी अंबरने त्याच्या माफीची मागणी केली होती. 'त्याने माझ्या लेकरांची कीव केली नाही, त्याने जे केलं ते निषेधार्हच आहे. पण माझ्या मुलांचं त्याच्यावर प्रेम होतं, म्हणून त्याला माफी मिळावी' अशी विनवणी अंबरने रडवेल्या स्वरात केली.
सप्टेंबर 2014 मध्ये मिसिसिपीमध्ये जोन्सला अटक झाली होती. त्यानंतर अलाबामात सर्व मुलांचे मृतदेह त्याने पोलिसांना दाखवले. नाथनला शिक्षा दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आपण इतर चार मुलांची गळा आवळून हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement