South Africa: आफ्रिकेतील महिलेचा विश्वविक्रम, एकाच वेळी 10 मुलांना जन्म
दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या एका महिलेने एकाच वेळी दहा मुलांना जन्म देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याचबरोबर या महिलेने आपल्या नावावर एक नवीन विश्वविक्रम केला आहे.
आजकाल स्त्रीने एकाच वेळी 3 ते 4 मुलांना जन्म देणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र, एखाद्या स्त्रीने एकाच वेळी दहा मुलांना जन्म दिला असं तुम्ही कधी ऐकलंय का? वास्तविक दक्षिण आफ्रिकेतही असेच घडले आहे, येथे एका महिलेने 10 मुलांना जन्म देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 7 जून रोजी गोसियामी धमारा सिटहोल नावाच्या 37 वर्षीय महिलेने एकाचवेळी दहा मुलांना जन्म देऊन नवीन विश्वविक्रम निर्माण केला आहे. या महिलेचे बाळंतपण सिजेरियनद्वारे करण्यात आले आहे. यात तिने सात मुले आणि तीन मुलींना जन्म दिला आहे.
त्याचवेळी, आफ्रिकन माध्यमांनुसार, डॉक्टरांनी प्रसूतीपूर्वी त्या महिलेला 6 मुलांचा जन्म होईल अशी माहिती दिली होती, तर त्या महिलेच्या पतीला आठ मुलांच्या जन्माची अपेक्षा केली होती. हे जोडपे त्यांच्या 10 मुलांच्या जन्मामुळे खूप आनंदित आहेत. पण, सिटहोलसाठी एकाचवेळी 10 मुलांना जन्म देणे सोप नव्हतं. प्रसूतीच्या वेळी डॉक्टरांनी अतिशय सावधगिरीने काम केले आणि त्या महिलेचा आणि तिच्या मुलांचा जीव वाचविला.
विश्वविक्रमाची नोंद
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात मोरोक्कोमध्ये मालीच्या हलिमा सिसी नावाच्या महिलेने एकाच वेळी 9 मुलांना जन्म देऊन नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविला होता. मात्र, आता एका महिन्यानंतर हा विक्रम मोडला गेला आहे, कारण सिटहोलने एकाचवेळी 10 मुलांना जन्म दिला.
गरोदरपणात सिटहोल आजारी होती
आफ्रिकन माध्यमांनुसार, सिटहोल आणि तिची मुलं सुदृढ आहेत. काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. त्याचवेळी, सिटहोलने सांगितले की गर्भधारणेदरम्यान ती खूप आजारी पडली होती. ती वेळ तिच्यासाठी खूप कठीण होती. सिटहोल यांच्या म्हणण्यानुसार, या गरोदरपणात त्यांना वेदना होत होत्या पण आता तो ठीक आहे.