एक्स्प्लोर

Shiv Jayanti | न्यूयॉर्कमध्ये घुमला 'जय शिवराय'चा गजर, दूतावासात शिवजयंतीचा उत्साह

न्यूयॉर्कमध्ये गेल्या सात वर्षांपासून शिवजयंतीला शिवघोष दुमदुमतो आहे. भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांनी स्थापन केलेल्या 'छत्रपती फाउंडेशन'च्या वतीनं दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं.

अकोला : अमेरिकेतील न्यूयॉर्कचा भारतीय वाणिज्य दूतावास आज 'जय शिवाजी, जय भवानी' या घोषणांनी अक्षरशः दुमदुमून गेला होता. निमित्त होतंय न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासात साजऱ्या करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवाचं. छत्रपती फाऊंडेशन, भारतीय वाणिज्य दुतावास आणि अल्बानी ढोल-ताशा समूह यांनी संयुक्तपणे या शिवजयंती कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, उद्योगपती मनोज शिंदे, भारतीय वाणिज्य दूतावासातील दुत ए.के. विजयकृष्णन उपस्थित होते. शिवजयंती कार्यक्रमाला न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, पेनसिल्व्हेनिया आणि मॅसॅच्युसेट्स या सभोवतालच्या राज्यातूनही शिवभक्त उपस्थित होते. यावेळी अल्बानी ढोल-ताशा समूहाच्या कलाकारांनी शिवजन्म, शिवराज्यभिषेकाचे प्रयोग सादर केले आहेत. यासोबतच तबला, विणा वादनासह संगिताचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत आदरांजली वाहिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'छत्तीसगड आणि विदर्भ हे एकाच बेरार प्रांताचे भाग होते आणि आजही मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक छत्तीसगडमध्ये राहत असल्याचं सांगतांनाच छत्तीसगडची महाराष्ट्रासोबत सामाजिक नाळ असल्याचं म्हटलंय. साता समुद्रापार शिवविचार पेरणाऱ्या छत्रपती फाउंडेशनच्या कार्याचाही त्यांनी यावेळी गौरव केला. सोबतच आयोजनासाठी भारतीयांना प्रोत्साहीत करणाऱ्या भारतीय वाणिज्य दूतावासाचंही त्यांनी कौतुक केलं. Shiv Jayanti | न्यूयॉर्कमध्ये घुमला 'जय शिवराय'चा गजर, दूतावासात शिवजयंतीचा उत्साह यावेळी बोलताना उद्योगपती आणि 'कॉग्निजंट सॉफ्टवेअर' समूहाचे सीईओ मनोज शिंदे यांनी अमेरीकन कॉर्पोरेट जगतातील भारतीयांच्या योगदानाचा गौरव केला. यासोबतच त्यांनी मराठी तरूणाईला व्यवसायात उतरण्याचं आवाहन केलं. भारतीय वाणिज्य दुतावासातील अधिकारी ए. के. विजयकृष्णन यांनी शिवजयंती साजरी करणारं आपलं दुतावास अमेरिकेतील प्रथम वाणिज्य दूतावास असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. याच कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या मार्गदर्शन सत्रात आय.आय. सॉफ्टवेअरचे सीईओ श्याम कुमार, फ्लोरिडाच्या एन.वाय. कॉलेजचे अध्यक्ष अमित शोरेवाला, ग्लोबल इन्फोटेक सोल्यूशन्सचे उपाध्यक्ष किशोर गोरे आणि सत्राचे समन्वयक गौरव दळवी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी छत्रपती फाऊंडेशनचे अनेक वर्षांपासून सदस्य असलेले आणि विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये महेंद्र सिनारे, रोहन डाबरे, मिस भारत न्यूयॉर्क अलिशा मर्चंट यांचा समावेश आहे. आज छत्रपती फाऊंडेशनच्या वतीनं कोलोरॅडो प्रांतातील डेन्व्हर आणि टेक्सास राज्यातील डलास येथेसुद्धा आज शिवजयंती साजरी करण्यात आलीय. आजच्या कार्यक्रमासाठी क्रिकेटस्टार अजिंक्य रहाणे, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार विनायक मेटे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्यात. न्यूयॉर्कमधील या शिवजयंती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष विनोद झेंडे, सचिव गौरव दळवी, कल्याण घुले (अल्बनी), अभिनव देशमुख (जॉर्जिया ), ऋषिकेश माने (पेनसिल्व्हेनिया), साकेत धामणे (न्यूयॉर्क), प्रशांत भुसारी (टेनेसी), प्रियंका कुरकुरे (न्यू जर्सी), श्रद्धा सहाणे (न्यू जर्सी), सुरेश गायकवाड (कनेक्टिकट) या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
Embed widget