एक्स्प्लोर

शिवरायांचा पुतळा हटवला तिथेच पुन्हा स्मारक; मुख्यमंत्री कमलनाथ स्वत: हजर राहणार

मध्य प्रदेशात जिथे शिवरायांचा पुतळा हटवला तिथेच पुन्हा स्मारक बांधले जाणार असून मुख्यमंत्री कमलनाथ स्वत: शीलान्यासासाठी हजर राहणार आहेत.

भोपाळ : मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये अतिक्रमण हटाव मोहीमेत ज्या चुकीच्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला होता. त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींकडून रोष व्यक्त होत होता. या प्रकरणी महाराष्ट्रातले काँग्रेस नेते राजीव सातव, मंत्री सुनील केदार यांनी तातडीनं हा विषय कमलनाथ यांच्या कानावर घातल्यानं आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणाहून हा पुतळा हटवण्यात आला होता, तिथेच योग्य जागेवर शिवरायांच्या पुतळ्याची पुन्हा विधीवत स्थापन होणार असून त्या स्मारकाच्या शीलान्यासासाठी स्वत: मुख्यमंत्री कमलनाथ हजर राहणार आहेत. अतिक्रमणाच्या दरम्यान कारवाई करताना अधिकाऱ्यांनी किमान महापुरुषांच्या सन्मानाला तडा जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती, त्यामुळे याबाबत अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबतही चौकशी होणार असल्याचं मंत्री सुनील केदार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. छिंदवाडा जिल्ह्यातल्या सौसरमध्ये 11 फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यात जेसीबीच्या साहाय्यांना महाराजांचा पुतळा हटवण्यात आला होता. या कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरु लागल्यानंतर त्याबद्दल महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत होता. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही याबाबत काँग्रेसवर टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांवर लवकरच हॉलिवूडपट, भारत सरकार आणि मार्टिनी फिल्म्स करणार निर्मिती खासदार संभाजीराजे यांची टीका - मध्यप्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जेसीबी लावून हटवल्याने खासदार छत्रपती संभाजीराजे काँग्रेस सरकारवर प्रचंड संतापले आहेत. शिवरायांची मूर्ती हटवल्याने जनआक्रोश वाढला आहे. त्याची झळ सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिलाय. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विट करून हा इशारा दिलाय. ते म्हणतात, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा. मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. असल्या क्रूर पद्धतीने हटवून तुम्ही नेमकं काय सिद्ध करू पाहत आहात? असे कृत्य छत्रपतींचा वंशज म्हणून कदापीही सहन करु शकत नाही. या ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसच्या ट्विटर हँडलला ट्विट केलं आहे. Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांवर लवकरच हॉलिवूडपट | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Abhijeet Dipke: 'आज मी जंतर-मंतरवर दिसलो नाही तर...'; अभिजीत दिपकेंचा आंदोलकांना महत्त्वाचा मेसेज, नेमकं काय म्हणाले?
'आज मी जंतर-मंतरवर दिसलो नाही तर...'; अभिजीत दिपकेंचा आंदोलकांना महत्त्वाचा मेसेज, नेमकं काय म्हणाले?
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Embed widget